कोल्हापूर: कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे किल्ल्याची महत्त्वाची भिंत मंगळवारी ढासळली आहे. गावाकडे तोंड करून असलेल्या या बुरुजाची तळाची बाजू ढासळल्याने आता वरचा बुरूज धोकादायक झाला असून तो केव्हाही कोसळू शकतो. ( )

वाचा:

बुरुजाला संरक्षण देण्यासाठी ही भिंत उभारण्यात आली होती मात्र ही भिंत कोसळली असल्याने या शिवकालीन किल्ल्याच्या तटबंदीला धोका पोहोचण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वीच समुद्रातील एक बुरूज खालून पोखरला असल्याने या बुरुजाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे. यातच हा नवीन बुरुज ढासळल्याने या किल्ल्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाचा:

ऐतिहासिक महत्त्व असलेला

मराठी साम्राज्याचे यांची ही दक्षिणेकडील आरमारी राजधानी होती. या किल्ल्याने तब्बल १३ लढाया घनघोर पणे लढल्या आहेत. विजयदुर्ग हा जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे आहे. अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटे विजयदुर्गची भिंत कोसळली. याची माहिती किल्ल्यावरील कर्मचारी रामदास आणि साशंक शिरवाडकर यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकारी यांना दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here