पुणे : खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे हनुमान महाराज आणि कानिफनाथ महाराज गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने रिलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलच्या शोची वेगळीच चर्चा रंगली होती. हा कार्यक्रम कुठलाही तंटा, भांडणे न होता निर्विघ्न पार पडला. त्यामुळे या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

खेड तालुक्यातील मोहितेवाडी म्हणजे आमदार दिलीप मोहिते यांचे गाव होय. मोहितेवडी येथे हनुमान आणि कानिफनाथ महाराजांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेनिमित्त रील स्टार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटीलच्या आतापर्यंत जवळपास सर्व कार्यक्रमामध्ये राडा होताना पाहायला मिळाला. कुठेही कार्यक्रम असला की कार्यक्रम मधूनच बंद करायला लागत असे मात्र या कार्यक्रमात मात्र संपूर्ण गावाने सहभाग घेत तिच्या कार्यक्रमाला दाद दिली. या कार्यक्रमात लहानांपासून मोठ्यानी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले.

गौतमी पाटील तिच्या नृत्याच्या कलेने चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा चांगला फॅन फॉलोवर्सचा वर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चांगली चर्चा असते. गौतमी पाटीलची तरुणाईमध्ये चांगली क्रेझ असून तिच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना पाहायला मिळते.
काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात मात्र मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. आयोजकांना त्यामुळे हा कार्यक्रम देखील बंद करावा लागला होता.

देव तारी त्याला… फक्त १४ धावांवर असताना जीवदान मिळालं अन् ७३ रन्ससह दिल्लीचे वाजवले बारा

नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

मोहितेवाडीच्या नागरिकांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. यात्रेनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानं लहान मुलांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळाले. शिवाय नागरिकांसह महिला देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. ग्रामस्थांचं योग्य नियोजन आणि तरुणाईच्या समंजसपणामुळं गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडला. मोहितेवाडीतील कार्यक्रमात कसल्याही प्रकारचं विघ्न आलं नाही.

वीर सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही, आम्ही आधी जे बोललो ते हिंदू महासभेसाठी होते- शरद पवार

दरम्यान, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांच्या फीवरुन गेल्या काही दिवसांपूर्वी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळं त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

शिंदेंच्या शिलेदाराच्या मनात नक्की काय ? पक्का शिवसैनिक म्हणत थेट संजय राऊतांची केली स्तुती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here