कोल्हापूर: संयोगिताराजे छत्रपती यांनी दाखवलेल्या धाडसाचा मला अभिमान असून आजही राज्यात अनेक मंदिरात अपप्रवृत्तीचे लोक आहेत. राज्य सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे आणि राज्यात पगारी पुजारी नेमायला हवेत, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंताने मज्जाव केल्याच्या आरोपांवरुन त्यांनी आपली मतं स्पष्ट केली.संयोगिताराजे यांनी विरोध केला, त्याचा मला अभिमान

नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी आपल्यास मज्जाव केला, असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी केला. याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपल्याला महंतांनी वेदोक्त मंत्र म्हणू देत नव्हते, असे म्हटलं. दरम्यान यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आपलं मत व्यक्त केला असून मंदिरातील अपप्रवृत्तीचा संयोगिता राजे यांनी विरोध केला त्याचा मला अभिमान आहे, असे म्हणत माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या मंदिरात दर्शनासाठी आणि पुजेसाठी गेल्या होत्या आणि तेथे त्यांना हा विचित्र अनुभव आला. असे कृत्य करणारे लोक निर्माण होऊ नयेत असे माझे मत आहे. तसेच वेदोक्त प्रकरणावर दीड महिन्यांनी बोलल्या म्हणजे त्या विचार करून वेळ घेऊन बोलल्या आहेत. तेव्हा माझा वाढदिवस होता आणि कोणताही वाद यावेळी निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी वेळ घेतला असेल, असेही संभाजी राजे छत्रपती म्हणाले.

तो सनातन धर्म आम्हाला मान्य नाही, खुलेआम सांगावे लागेल, संयोगिताराजेंच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाडांची खमकी पोस्ट
महंतांनी मोठ्या महाराजांची भेट घ्यावीच:

तसेच पुढे संभाजीराजे छत्रपती बोलताना म्हणाले, संयोगिताराजे छत्रपती या कधी राजकीय व्यासपीठावर गेल्या नाहीत. पण त्या जे काही बोलतात त्या फार विचार करून बोलतात. आम्हाला देखील काही चुकत असल्यास ते स्पष्टपणे सांगतात. आणि संयोगिता राजे यांनी आपल्या इंस्टाग्रामवर जे काही स्पष्टपणे मांडलं आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आजही मंदिरात अपप्रवृत्ती आहेत. ते बदलण्याची गरज आहे. अपप्रवृत्ती करणारे लोकांनी एकदा स्वतःला विचारले पाहिजे, असे म्हणत महंतांनी मोठ्या महाराजांना भेटले पाहिजे, असं चॅलेंजही त्यांनी यावेळी दिलं.

संयोगिताराजेंना मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध, आव्हाड संतापले, म्हणाले, सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा!
तसेच जे महंत आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे देखील सर्वांनी तपासले पाहिजे. जे अकृत्य वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात ते बंद झालं पाहिजे. छत्रपती घराण्यातील स्त्रीला अवमानकारक बोललं गेलं अशी वागणूक दिली गेली. आजच्या घडीला देखील हे का घडतंय? हे सरकारने पाहायला हवं असे ही संभाजीराजे म्हणाले आहेत.

महंतांनी आरोप फेटाळले

तर संयोगीताराजे या पावणेदोन महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी काळाराम मंदिरात महामृत्युंजय, रामरक्षा म्हटली होती. त्यांना कोणीही रोखलं नाही, असं महंत सुधीरदास यांनी म्हटले आहे. तरीही त्यांना त्यावेळी काही अपमानास्पद वाटलं असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत कोल्हापूरला जाऊन मोठ्या महाराजांचा देखील भेट घेईन असंही त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here