अकोला : ‘राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार’, अशा प्रकारचा व्हाट्सअप वर मेसेज देत राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना धमकी देण्यात आली आहे. आज सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी एका व्यक्तीने व्हाट्सअप वर मेसेज करत ही धमकी दिली आहे. याप्रकरणी अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.याबाबत आज आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे. ते म्हणतात की, ‘मत नसलेल्या सेनेच्या एका टुकार कार्यकर्त्याने आज मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली. राज्यातील जात्यंध परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मी अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात दखल घेत आरोपीस तत्काळ अटक करावी.’

मित्रांचा पार्टीचा आग्रह तरुणाच्या जीवावर बेतला, परतताना घडले धक्कादायक, ४ वर्षांच्या चिमुरडीचे पितृछत्र हरपले
एका व्हाट्सअप क्रमांकावरून आज सकाळी १० वाजून ४१ मिनिटाने मिटकरी यांच्या व्हाट्सअप वर मेसेज आला. ज्यामध्ये, ‘राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार’, असा मजूकर लिहला आहे. अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी व इशाऱ्याचा संदेश प्राप्त झाला असून मला माझ्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. कृपया या गंभीर प्रकाराची दखल घेऊन सदर अज्ञात इसमावर तात्काळ दाखल कार्यवाही करावी, अशा प्रकारची तक्रार मिटकरी यांनी पोलिसात दिली आहे.

रामनवमी उत्‍सवात शिर्डीच्या साईबाबाचरणी ३ दिवसांत ४ कोटींचे दान, २ लाख भक्‍तांनी घेतले दर्शन
या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे करीत आहे.

चिपळूणचा जवान अजय ढगळे सिक्कीममध्ये शहीद; भूस्खलनात बर्फाच्या ढिगाऱ्याखाली ४ जवान गाडले गेले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here