पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे नेहमी चर्चेत असतात. आता आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक बातमी पोस्ट केल्यानंतर कोल्हे पुन्हा चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हे आणि अमृता खानविलकर हे लवकरच लग्न करणार अशी बातमी छापलेली एक पोस्ट त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. नेटकऱ्यानी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी १ एप्रिल चा दिवशी ही पोस्ट करत मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे खुद्द अमृता खानविलकर हिने देखील या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवली आहे.अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉ. अमोल कोल्हे हे सध्या बायकोला कंटाळले आहेत. त्यामुळे ते चंद्रा फेम अमृता खानविलकर हिच्या प्रेमात आहेत. लवकर ते बायकोला घटस्फोट देऊन आणि अमृता खानविलकर सुद्धा तिच्या पतीला घटस्फोट देऊन दोघे विवाहबद्ध होणार असे चित्रपट क्षेत्रात बोलले जात आहेत. ‘या विवाहाचा माझ्या राजकीय कारकीर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्यामुळे मीपण उपमुख्यमंत्री होऊ शकेन, कारण अमृता हे नावच लकी आहे’ असं त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे.

जरा सांभाळून नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार, आमदार अमोल मिटकरींना व्हॉट्सअप मेसेजद्वारे धमकी
इंस्टाग्रामवर अमोल कोल्हे यांनी एका वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीची इमेज पोस्ट शेअर करत, ‘नशीब बायकोला माहितीये की आज १ एप्रिल आहे. नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती,’ अशी टिप्पणी देखील पोस्टमध्ये केली आहे. शिवाय त्यांनी पोस्टमधील शेवटच्या ओळीमध्ये क्रिएटिव्हीटी उल्लेखनीय आहे, असाही उल्लेख केला आहे.

amol kolhes instagram post

अमोल कोल्हे यांची इंस्टाग्राम पोस्ट

मित्रांचा पार्टीचा आग्रह तरुणाच्या जीवावर बेतला, परतताना घडले धक्कादायक, ४ वर्षांच्या चिमुरडीचे पितृछत्र हरपले
अमृता खानविकलकरनेही दिला रिप्लाय

या पोस्टवर अमृता खानविलकर हिने देखील रिप्लाय दिला आहे. हे काय आहे, असे तिने विचारले आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या बातमीमुळे नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. ही पोस्ट १ एप्रिलला पोस्ट झाल्याने नेटकऱ्यानी देखील तेवढीच एप्रिल फुलचे निमित्त साधत मजेशीर दाद दिली आहे.

रामनवमी उत्‍सवात शिर्डीच्या साईबाबाचरणी ३ दिवसांत ४ कोटींचे दान, २ लाख भक्‍तांनी घेतले दर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here