मावळ : मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच. प्रवीण साहेबराव गोपाळे यांचा अज्ञात हल्लेखोरानी भर चौकात निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. आज शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने मावळ तालुका हादरला आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७), असे खून झालेल्या सरपंचाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रवीण गोपाळे हे शिरगावचे विद्यमान सरपंच म्हणून काही दिवसांपूर्वीच निवडून आले होते. चांगल्या मतधिक्याने ते विजयी झाले होते. प्रवीण गोपाळे हे शनिवारी रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून शिरगाव चौकात कामानिमित्त आले होते. मात्र अचानक त्यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला.

अमोल कोल्हे, अमृता खानविलकर यांच्या लग्नाची ती बातमी; उपमुख्यमंत्रिपद, एप्रिल फुलचं टायमिंग
अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून केले कोयत्याने वार

अचानक हल्ला झाल्याने त्यांनी पळापळ सुरू केली. मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

जरा सांभाळून नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार, आमदार अमोल मिटकरींना व्हॉट्सअप मेसेजद्वारे धमकी
हलला केल्या नंतर मारेकरी घटनास्थळवरून फरार झाले आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच.पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटिव्हीद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मित्रांचा पार्टीचा आग्रह तरुणाच्या जीवावर बेतला, परतताना घडले धक्कादायक, ४ वर्षांच्या चिमुरडीचे पितृछत्र हरपले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here