मुंबई: करोनाचं संकट उभं ठाकलं असताना यंदा कोकणात गणेशोत्सवासाठी कसं जाणार हा प्रश्न , , पुण्यातील सर्वच चाकरमान्यांना पडला होता. सरकार पातळीवर याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने चाकरमानी चिंतेत पडले होते. मात्र, चाकरमान्यांचं गाऱ्हाण उशिरा का होईना पण सरकारने ऐकलं असून कोकणच्या वाटेतील बरीच विघ्न दूर करण्यात आली आहेत. ( MSRTC Buses For )

वाचा:

राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चाकरमान्यांबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी क्वारंटाइन कालावधी १४ दिवसांवरून १० दिवसांचा करण्यात येत आहे व एसटीच्या ३ हजार विशेष बसगाड्या चाकरमान्यांसाठी सोडण्यात येत आहेत, अशी घोषणा परब यांनी केली. ५ ते १२ ऑगस्टपर्यंत या गाड्या धावतील. एका बसमध्ये २२ प्रवाशांना प्रवास करता येईल. प्रवासासाठी ई-पास आवश्यक नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. परब यांच्या घोषणेनंतर एसटी महामंडळाने गाड्यांचे नियोजन कसे असेल, याचा तपशील जारी केला आहे.

वाचा:

एसटी बससेवा अशी असेल…

>
५ ते १२ ऑगस्ट – मुंबईहून कोकणात जाण्यासाठी .

>
२३ ऑगस्टपासून पुढे – कोकणातून मुंबईत येण्यासाठी एसटी सेवा (परतीचा प्रवास)

>
तिकीटदर– नेहमी प्रमाणे असेल.

>
विलगीकरणाचा कालावधी – १० दिवस

>
ई-पास– आवश्यकता नाही

>
प्रवासी संख्या – एका बसमध्ये २२ प्रवासी

>
आरक्षण– महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच महामंडळाने नेमलेल्या खासगी एजंटद्वारे (रेडबस आणि अन्य) तिकीट आरक्षित करता येईल. आज, ४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून आरक्षण करता येईल.

>
सांघिक आरक्षण – यासाठी एकाच गावात राहणाऱ्या २२ प्रवाशांनी एकत्र येऊन त्यांची यादी जवळच्या एसटी स्थानकावर/आगारावर जमा करावी, त्यानुसार सांघिक आरक्षण होईल.

>
गाड्यांची व्यवस्था – यंदा रेल्वे बंद असल्याने गाड्यांची संख्या वाढेल असा अंदाज आहे. सध्या ३००० गाड्या असून या व्यतिरिक्त अंदाजे ३००० गाड्या सज्ज ठेवण्याच्या सूचना राज्यातील विभागांना देण्यात आल्या आहेत.

असा असेल प्रवास

मुंबईहून कोकणातील प्रमुख स्थानकं अर्थात चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी अशा ठिकाणी गाड्या रवाना करण्यात येतील. या स्थानकावरून गावखेड्यापर्यंत पोहचण्यासाठी स्थानिक एसटी प्रशासनाकडून बस चालवण्यात येतील.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here