या अज्ञात इसमाचे शरीर कुजलेल्या स्थितीत असून ही घटना तीन चार दिवसांपूर्वीची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.
मुंबई गोवा महामार्गावर कामथे घाटात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोठ्या वळणावर ही घटना उघडकीस आली आहे. कामथे येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते समीर काझी हे सावर्डेत जात असताना त्यांना कामथे घाटात दुर्गंधीयुक्त वास आला. यावेळी त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. हा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेहाच्या अंगात पांढरा शर्ट आणि जीन्स पॅन्ट असून व्यक्तीचा गव्हाळ रंग असं वर्णन आहे.
जखमी अवस्थेत असलेला मृतदेह फुगलेल्या आणि कुजलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे ही घटना तीन चार दिवसांपूर्वीची असावी असा अंदाज आहे. या सगळ्या प्रकरणाची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या सगळ्या प्रकरणाचा तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News