मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा कालावधी २० ते २५ मिनिटांनी कमी करण्यासाठी खोपोली-कुसगावदरम्यान नव्या रस्त्याचं (मिसिंग लेन) बांधकाम हाती घेतलं आहे. हे काम ६५ टक्के पूर्ण झालं असून राहिलेलं काम युद्धपातळीवर सुरु आहे. डिसेंबर २०२२ अखेरीस रस्त्याचं काम पूर्ण होईल आणि जानेवारी २०२४ पासून हा नवीन रस्ता वाहतूक सेवेत दाखल होईल, असा दावा ‘एमएसआरडीसी’कडून करण्यात आला.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गामुळे प्रवास वेगवान झाला आहे. मात्र, त्याचवेळी या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘एमएसआरडीसी’ने अपघात रोखण्यासाठी, तसेच प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी खोपोली-कुसगावदरम्यान नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. या १९.२० किमी लांबीच्या या नव्या रस्त्याच्या (मिसिंग लेन) कामाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली.

मोदींना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचंय, अदानी त्यांचे पैसे मॅनेज करतात; ‘सामना’तून गंभीर आरोप
हा रस्ता २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, करोना आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे काम पूर्ण होण्यास उशीर झाला. आता हा नवा रस्ता २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या रस्त्याचे काम ६५% पूर्ण झालं आहे. तसेच दोन बोगद्यांचे काम ८०% पूर्ण झालं आहे. यापैकी एक बोगदा १.७५ किमी लांबीचा, तर दुसरा ८.९२ किमी लांबीचा आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आशियातील सर्वात रुंद असा डोंगर आणि तलावाखालून जाणारा ८.९२ किमी लांबीचा हा बोगदा आहे. लोणावळा तलावाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. या बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हे बांधकाम करण्यात येत आहे.

वेळेची बचत

या मार्गिकेत दोन उड्डाणपुलांचाही समावेश आहे. एका उड्डाणपुलाचे काम ८५%, तर दुसऱ्या उड्डाणपुलाचे काम २८% पूर्ण झाल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. तसेच जानेवारी २०२४ मध्ये ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर अर्ध्या तासाने कमी होईल, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला.

समृद्धी महामार्गावर कारची ट्रकला धडक: भीषण अपघातात २ डॉक्टर तरुणींसह आणखी एकाचा जागीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here