मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी पुष्टी केली आहे की कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या त्यांच्या इंडियन प्रीमियर लीगच्या सलामीच्या सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहेत. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बाउचर म्हणाले, ‘होय, रोहित तंदुरुस्त आहे.
गेल्या दोन दिवसांपासून त्याने सराव केला असून तो खेळण्यासाठी १०० टक्के फिट आहे. त्या दिवशी सकाळी त्याची तब्येत ठीक नव्हती आणि त्याची तब्येत लक्षात घेत आम्ही त्याला घरीच राहण्यास सांगितले. तो म्हणाला, ‘खेळाडूंना भरपूर फोटोशूट करावे लागते. त्यांना स्वतःसाठी जास्त वेळ मिळत नाही म्हणून आम्हाला वाटले की तो न जाणे अधिक चांगले होईल.’
मुंबई इंडियन्सची टीम एअरपोर्टवर स्पॉट, जोफ्रा आर्चरने खाल्ला भाव
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आर्चर मुंबई इंडियन्सच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तो स्वत: बऱ्याच दिवसांनी दुखापतीतून पुनरागमन करत आहे. बाउचर म्हणाले, “जोफ्रा उद्याच्या सामन्यासाठी १०० टक्के तयार आहे.” तो आज प्रशिक्षणासाठी उपस्थित नव्हता कारण, ते एक वैकल्पिक प्रशिक्षण सत्र होते. त्याला वाटले की तो उद्यासाठी तयार आहे. तो उद्या खेळेल.”
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्याने दोन्ही संघ आयपीएलमधील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.