म. टा. प्रतिनिधी, पुणे : सासवड रस्त्यावर तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासवड रस्त्यावरील वडकी गावातील शेतात एका तरुणाचा मृतदेह सापडला. तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह शेतात टाकण्यात आला होता. खून झालेल्या तरुणाची पोलिसांना ओळख पटलेली नाही.याबाबत पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खून झालेल्या तरुणाचे वय अंदाजे ४० वर्षे असून, त्याची ओळख पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हडपसर-सासवड रस्त्यावर टाकमाळ परिसरात एका हॉटेल व्यावसायिकाची शेतजमीन आहे. हॉटेल व्यावसायिक शेतातील लाकडे जळणासाठी वापरतो. हॉटेलमधील कामगार शेतात लाकडे आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी झुडपात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला.

मुंबई-पुणे अंतर आणखी कमी वेळेत पार होणार; एक्स्प्रेस वेवरील खोपोली–कुसगाव लेनचे ६५ टक्के काम पूर्ण

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह कुजलेला असल्याने पोलिसांना ओळख पटली नाही. तरुणाचा खून करून मृतदेह शेतात टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. शवविच्छेदन अहवालात तरुणाच्या मानेवर शस्त्राने वार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. लोणी काळभोर पोलिस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here