मटा वृत्तसेवा, वसई: वसई किल्ल्याजवळ आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून वेळीच आग लागल्याचे निदर्शनास आल्याने फक्त गवत जळून खाक झाले आहे.

सोमवारी रात्री ९. ३० च्या सुमारास वसईच्या ऐतिहासिक वसई किल्ल्यात असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळील खजुराच्या झाडांजवळ आग लागली होती. हि माहिती येथील स्थानिकांतर्फे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली असता अग्निशमन दल तात्काळ आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. आग जास्त पसरली नसल्याने लगेचच आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. मात्र तरीही येथील खजुराच्या झाडांच्या मुळांना आगीचे चटके लागल्याने ती झाडे मरून पडण्याची शक्यता आहे.

अग्निशमन दलाने तात्काळ ही आग तात्काळ विझविली असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, किल्ल्यात येणाऱ्या मद्यपी आणि गर्दुल्ल्यांमार्फत ही आग लागली असल्याची शक्यता असल्याचे येथील स्थानिक समीर देसाई यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here