बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथे एका मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. जवळच असलेल्या घाटपळशी ते पळशी फाटा पिंपळगाव काळे शिवारामधील हरिभाऊ दयाराम तायडे यांच्या वीट भट्टीवरील पिता-पुत्रांमध्ये घरगुती वादावरून शाब्दिक चकमक झाली. या वादाचे रूपांतर मारामारीत झालं. मुलगा भाऊ सिंग भैरड्या (वय ४०) याने त्याचे वडिल नानसिंग पहाडसिंग भैरड्या (वय ६०) यांच्या डोक्यात बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात अधिक चौकशी केली असता ही घटना रात्रीची असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती कामावर असलेल्या मयूर हरिभाऊ तायडे यांनी दिली. मृतक नानसिंग पहाडसिंग हा लोखंडी पलंगावर पडलेला असून काही हालचाल होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी मयूर हरिभाऊ तायडे यांनी जळगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली.

सावधान! मुंबई आणि कोकणात एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट, तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता
सदर घटना काल सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृत आणि त्याचा मुलगा दोघेही कडूपट्टा जळगाव परिसरातील आदिवासी असून ते वीट भट्टीवर मजुरीने काम करतात. या प्रकरणी आरोपी भाऊ सिंग भैरड्या याच्या विरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल झाला असून ठाणेदार दिनेश झांबरे यांनी गतिमान तपासचक्रे फिरवत दोन तासात आरोपीला अटक केली. दरम्यान, पुढील तपास सह पोलीस निरीक्षक कैलास चौधरी करत आहेत.

एका रात्रीत वेटर झाला कोट्यधीश, तरी अजूनही करतो रेस्टॉरंटमध्ये काम, कारण वाचून कौतुक वाटेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here