म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूरः खासगी रूग्णालयांना एकूण क्षमतेच्या ८० टक्के खाटा करोना रूग्णांसाठी राखीव ठेवत नेमून दिलेल्या दरशुल्कात उपचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही गांधीनगर येथील वोक्हार्ट रूग्णालयातर्फे रूग्णांकडून अधिकची ७० टक्के वसुली करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मनपा आयुक्त यांनी वोक्हार्ट रूग्णालय व्यवस्थापनास यासंदर्भात २४ तासांत लेखी खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. अन्यथा, सध्याच्या काळातील विविध कायद्यांन्वये कारवाईचा इशारा दिला आहे.

राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरातील खासगी रूग्णालयातील ८० टक्के खाटा करोना रूग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी दरशुल्कही निर्धारीत केला आहे. शहरातील वोक्हार्ट रूग्णालयात ४० खाटा करोना रूग्णांसाठी आरक्षीत आहे. या सर्व खाटा फुल्ल आहेत. २६ जुलै रोजी या रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांवरील उपचार व शुल्काबाबत मनपाच्या पथकाने माहिती घेतली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पथकाला रूग्णांकडून नमुद करून दिलेल्या सेवांव्यतिरीक्त इतर सेवा घेत नसतानाही अतिरीक्त शुल्क आकारले जात असल्याचे आढळले. शिवाय, ज्या ठिकाणी अशा रूग्णांना उपचारार्थ भरती करावयाचे आहे. त्याव्यतिरीक्त इतर खोल्यांमध्येही भरती करण्यात आले. ही बाब ४ जूनच्या नियमांचे सरळसरळ उल्लंघन असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे वोक्हार्ट रूग्णालयाच्या व्यवस्थापनास साथरोग कायदा,१८९७, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा (सुधारीत)२०११, मुंबई नर्सीग हेम (सुधारीत)कायदा, २००६, बॉम्बे नसींग होम नोंदणी(सुधारीत)कायमा २००६ आणि बॉम्बे पब्लीक ट्रस्ट अॅक्ट, १९५० अंतर्गत नोटीस बजावत तातडीने खुलासा करण्याचे निदेंश देण्यात आले. अन्यथा, कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

काय होऊ शकते?

देशात सध्या आपत्कालीन कायदे लागू आहेत. अशात खासगी रूग्णालयातील व्यवस्थांवरही प्रशासन नियंत्रण ठेवू शकते. संपूर्ण रूग्णालय ताब्यात घेण्याचेही अधिकार आहेत. असे असताना रूग्णांवर उपचार व्हावेत यासाठी व्यवस्थेअंतर्गत खासगी रूग्णालयातील एकूण क्षमतेच्या८० टक्के खाटा दरशुल्कासह सेवेत घेण्यात आली. त्यातही उघडपणे नियमांचे उल्लंघत होत असल्याची बाबी अत्यंत गंभीर आहे. हे बाब सत्य असल्यास संबंधीत रूग्णालयाचा उपरोक्त कायद्यान्वये नोंदणी रद्द करून टाळे ठोकण्याचे अधिकारही प्रशासनास आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here