नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये दोरीने गळा आवळून १७ वर्षीय मुलाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही थरारक घटना रविवारी सकाळी कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील गुलमोहरनगर येथे उघडकीस आली. या घटनेने पोलीस व रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. चंदन कन्हय्या लहरे,असे मृत मुलाचं नाव आहे. तो टाइल्स फिटिंगचे काम करायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदनचे वडील कन्हय्या खासगी काम करतात. त्याला लहान भाऊ आहे. मध्यरात्री चंदन हा घराबाहेर निघाला. रविवारी सकाळी चंदन हा घराबाजूला असलेल्या पडक्या घरात बेशुद्ध अवस्थेत नागरिकाला दिसला.त्याच्या गळ्याभोवती दोरी होता. एखा नागरिकाने त्याच्या वडिलाला माहिती दिली. वडिलाने नागरिकांच्या मदतीने चंदनला घरात आणले.

SRH vs RR Live Score: राजस्थानच ५ षटकांतच धावांचा डोंगर, हैदराबादला मिळाली पहिली विकेट

दरम्यान, १७ वर्षीय मुलाचा खून झाल्याची माहिती कळमना पेालिसांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. चंदनचा खून करण्यात आला की त्याने आत्महत्या केली हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. तूर्त कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
ठाकरेंचं नेतृत्व, तिन्ही पक्षांची एकजूट, छत्रपती संभाजीनगरची वज्रमूठ सभा मविआसाठी का महत्त्वाची?

गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी रामनवमीच्या मिरवणुकीवेळी दोन कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्या वादात एका महिलेचा मृत्यू झाला होता. नागपूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागपूर शहरात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या दोन कुटुंबांमध्ये पायऱ्यांवर बसण्यावरुन वाद झाला होता. यामध्ये एक महिला जखमी झाली होती. त्या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. यानंतर तीन महिला आणि एका पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर संशयित आरोपी महिला फरार झाल्या आहेत. नागपूर पोलिसांकडून संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत.

भोंदूबाबाच्या आडून कसली ट्रायल घेता? साईबाबांविषयी भूमिका स्पष्ट करा, रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here