जबलपूर: बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे दर्शन न मिळाल्याने जबलपूर येथील एका महिलेने आत्महत्या केली. आपला पती आपल्याला धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात घेऊन जात नाही म्हणून ही महिला दुःखी होती. बागेश्वर धाम आणि पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर श्रद्धा असलेल्या या महिलेला हा धक्का सहन झाला नाही आणि तिने आपल्या दोन निरागस मुलांना सोडून मृत्यूला कवटाळले. हे धक्कादायक प्रकरण जबलपूरच्या अधारतल पोलीस स्टेशन हद्दीतील कंचनपूर भागातील आहे.कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

पल्लवी असं या आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. पल्लवी ही पती संदीप चौधरी, दोन मुले आणि सासूसोबत राहत होती. तिची सासू गंभीर आजारी आहे. पतीची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. पल्लवीचा पती कसा तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरी आर्थिक परिस्थिती बेताची त्यात संदीपला आपल्या दोन मुलांना शिक्षण आणि आपल्या आजारी आईच्या उपचाराचा खर्चही करावा लागत होता. अशा परिस्थितीत पत्नीचे ऐकण्याऐवजी त्याने आईच्या उपचाराला प्राधान्य दिले, त्यामुळे संतापून पल्लवीने आपले जीवन संपवले.

किर्तनकारांना नावं ठेवतात अन् गाण्याच्या कार्यक्रमात शिट्ट्या; इंदुरीकर महाराजांचा गौतमीवर निशाणा

संदीपने सांगितले की, पल्लवी दररोज बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे प्रवचन ऐकत असे आणि घरातील अडचणी दूर करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेले उपायही ती करत असे. २५ ते ३१ मार्च दरम्यान जबलपूरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले होते.

पती सासूला घेऊन रुग्णालयात गेला, पत्नीने घरी आत्महत्या केली

पल्लवीला हे कळताच तिने २७ मार्च रोजी पतीकडे बागेश्वर बाबांच्या दर्शनासाठी आणि कथा ऐकण्यासाठी जावे, असा आग्रह धरला. मात्र, त्याच दिवशी संदीपने त्याच्या आजारी आईला उपचारासाठी रुग्णालयात नेले आणि डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना परतायला थोडा वेळ लागला. दुसरीकडे, घरी बाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी थांबलेल्या पल्लवीने रागाच्या भरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

चिकन बनवताना वाद, त्यानं २ पुतण्यांसह विधवा वहिनीला संपवलं, शेणाच्या खड्ड्यात पुरलं; पण एक चूक अन्…
संदीप घरी परतला तेव्हा त्याला पल्लवी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. दुसरीकडे, आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की पल्लवीने पतीची परिस्थिती समजून न घेता इतका मोठा निर्णय घेतला. तर काही लोकांचे म्हणणे आहे की, ही घटना बाबांवरील अंध भक्तीचा परिणाम आहे.

नवी मुंबईत एका कोंबडीमुळे १९ वर्षीय तरुणाचा जीव गेला, चोरांकडून कुऱ्हाडीचे घाव, तडफडत जीव सोडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here