बारामती : एका तरुणीसोबतचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गुणवडी येथील एकाने तरूणीसोबत वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती येथे उघडकीस आला आहे. याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उघड झालेल्या या प्रकारमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.या प्रकरणाबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित तरुणी ही २२ वर्षांची आहे. ही तरुणी आणि आरोपी सोहम भोई (राहणार- गुणवडी, तालुका- बारामती) या दोघांची २०१९ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीनंतर त्यांच्यामध्ये शरीरसंबंध आले. यानंतर आरोपी त्याला वाटेल तेव्हा त्यांचे खाजगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेऊ लागला होता, असे दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मावळ तालुका हादरला! शिरगावच्या सरपंचाचा भर चौकात खून, पाठलाग करून केले कोयत्याने वार
पीडित तरुणीने केली लग्नाबाबत विचारणा

दिनांक ३१ मार्च रोजी ही पीडित तरुणी आरोपी सोहम भोई याच्याकडे गेली व त्याला लग्नाबाबत विचारणा केली. मात्र तरुणीचा हा विचार ऐकल्यांतर सोहमला प्रचंड राग आला. सोहम याने या तरूणीला गाडीवर बसवून मेडद या ठिकाणी नेले. तेथे सोहमची आई, बहिण, वडील व मित्र वैभव यांनी तिला मारहाण केली. ‘सोहमचा नाद सोड’ अशी धमकीही त्यांनी पीडित तरुणीला दिली.

अमोल कोल्हे, अमृता खानविलकर यांच्या लग्नाची ती बातमी; उपमुख्यमंत्रिपद, एप्रिल फुलचं टायमिंग
आरोपीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

यानंतर हताश झालेल्या या पीडित तरुणीने पोलिसात तक्रार करण्याचे मनाशी पक्के केले. त्यानंतर तिने बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. यानंतर सबंधीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या तक्रारीवरून विविध कलमांतर्गत तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहेत.

जरा सांभाळून नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार, आमदार अमोल मिटकरींना व्हॉट्सअप मेसेजद्वारे धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here