Dhule News : पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा धुळे पॅटर्न सध्या चर्चेत आहे. धुळ्यात पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा झाली. ही परीक्षा अतिशय चोख बंदोबस्तात झाली. पोलीस अधीक्षकांनी बारकाईने लक्ष ठेवलं होतं.

 

dhule police bharti
पोलीस भरतीत धुळे पॅटर्न चर्चेत; खुल्या मैदानावर लेखी परीक्षा; २० हून अधिक कॅमेऱ्यांची नजर
धुळे : सध्या संपूर्ण राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला. आता यातील शारीरिक आणि कौशल्य चाचणीमधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा आज धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मोकळ्या मैदानात घेतली गेली. धुळे जिल्हा पोलीस कवायत मैदानावर पोलीस शिपाई व चालक या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. धुळे जिल्ह्यातील ४२ पदांसाठी ५०५ महिला आणि पुरुष उमेदवार लेखी परीक्षेत सहभागी झाले आहेत. सकाळी सात वाजेपासून या परीक्षेला सुरुवात करण्यात आली होती. परीक्षेसाठी आलेल्या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना परीक्षेच्या ठिकाणी सोडण्यात आले.

मुंबईत महिलेने जीवन संपवलं, धुळ्यातील वकील वादात; मित्राची जमीन बळकावल्याच्या आरोपावर म्हणाला..
शहरातील पोलीस मुख्यालयात होत असलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच ही परीक्षा पारदर्शकपणे पार पाडावी याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. खुल्या मैदानात ही परीक्षा घेण्यात येत असून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत ही परीक्षा पार पडली. यावेळी जिल्हा पोलिसांनी २० हून अधिक कॅमेरे या परीक्षेच्या वेळी लावले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.

धुळेकरांना काश्मीरमध्ये असल्याचा भास; लिंबाएवढ्या गारांचा पाऊस, रस्ते झाले बर्फाच्छादित

बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षकांनी रात्रीच्या वेळेस त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण यावेळेस बघायला मिळाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here