रत्नागिरी चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर अनेकदा दुर्घटना घडत असतात. रेल्वे मार्गाजवळ जाताना काळजी घेणं आवश्यक असतं. मात्र काळजी न घेता घडलेल्या अनेक दुर्घटनांमध्ये आजवर अनेकांचे जीव गेले आहेत. अशीच एक घटना आज रविवारी सकाळी पेढे येथे घडले असून यामध्ये एका बावीस वर्षे तरुणाचा रेल्वेखाली ट्रॅकवर जागीच मृत्यू झाला आहे. चिपळूण तालुक्यातील पेढे कुंभारवाडी येथील उमेश दिलीप मालवणकर या युवकाला रेल्वेची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण नजीक असलेल्या पेढे कुंभारवाडी येथे आज रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅक ओलांडत शेतात जात असताना उमेश याला मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने येत असलेल्या एका रेल्वेची धडक बसली. त्यात त्याचा चेदा मेंदा होऊन जागीच मृत्यू झाला.
उमेश जनावरांना घेऊन शेताकडे गेला होता. त्यावेळी हा दुर्दैवी धक्कादायक प्रकार घडला. उमेश मालवणकर हा युवक लोटे एमआयडीसी एका कंपनीत कामाला होता. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून उमेशचा मृतदेह शवविच्छेदनााठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. उमेश याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे.

पेढे कुंभारवाडी येथील हा युवक प्रेमळ व अतिशय मृदू स्वभावाचा म्हणून ओळखला जात होता. त्याच्या जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. लोटे येथे एका कंपनीत काम करून तो घरी कुटुंबियांना लागेल ती मदत करायचा. जेव्हा कंपनीच्या कामातून वेळ मिळेल तेव्हा तो कुटुंबाला हातभार लावायचा. उमेश हा धडपड्या स्वभावाचा म्हणून ओळखला जायचा.
३० वर्षीय उमेश मालवणकर याच्या मृत्यूने पेढे कुंभारवाडीवर शोककळा पसरली आहे. उमेदीच्या काळात तरुण पोराच्या जाण्याने कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. जेव्हा उमेशच्या मृत्यूची वार्ता कुटुंबियांना कळाली, तेव्हा त्यांनी हंबरडा फोडला. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News