पुणे: शहर जिल्ह्यात मंगळवारी २०९८ जणांना संसर्गाची लागण झाल्याने रुग्णांची संख्या ९५ हजारापर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यात आणखी ५६ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले. पुणे शहरात एका दिवसात १३१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ६५६ रुग्ण गंभीर आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णांची संख्या थोडीशी घटल्याने दिलासा मिळत आहे. ( In )

वाचा:

पुण्यात एका दिवसात ५५९५ एवढ्या चाचण्या घेण्यात आल्या. तर विविध रुग्णालयांमध्ये ६५६ रुग्ण हे गंभीर असून ४०४ रुग्ण अतिदक्षता विभागात तर २५२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच २१७२ रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. तसेच १३१२ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे पुण्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४१ हजार २५१ एवढी झाली आहे. तर एकूण जिल्ह्यात बरे झालेल्यांची संख्या ही ६६ हजार ५४० एवढी आहे. तर जिल्ह्यात एकूण लागण झालेले रुग्ण हे ९४ हजार ९७८ एवढे असले तरी त्याच्या तुलनेत निम्म्याहून अधिक रुग्ण हे बरे झालेले आहेत. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

वाचा:

ससूनमधून १,००५ रुग्णांना ‘डिस्चार्ज’

करोनाग्रस्तांच्या मृत्यूची आकडेवारी लपविल्याचा आरोप रुग्णालयावर होत असताना दुसरीकडे गेल्या चार महिन्यांत करोनाच्या दाखल झालेल्या एकूण रुग्णांपैकी एक हजार पाच रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. चार दिवसांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत आणि अन्य आजार असलेले रुग्ण व्हेंटिलेटरवर असूनही बरे होऊन घरी परतल्याची माहिती समोर आली आहे. गर्भवतींवरदेखील बाधा झाल्यानंतर यशस्वी उपचारानंतर त्या बाळासह सुखरूप घरी परतल्या आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयातही रुग्ण बरे होत असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. आजमितीला रुग्णालयातील नव्या इमारतीत ४४६ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, यात अतिदक्षता विभागासह आयसोलेशन, व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मार्च ते आतापर्यंत चार महिन्यांत ससून रुग्णालयात ८ हजार ७८० एवढे संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ७५४ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण दाखल झाले; शिवाय संशयित रुग्णांची संख्या अधिक असून, ७ हजार ०२६ रुग्णांवर संशयित म्हणून उपचार केले गेले. रुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ५७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. सद्यस्थितीत ससून रुग्णालयात १०० रुग्ण व्हेंटिलेटवर, तर १३० रुग्ण व्हेंटिलेटरवर नसले, तरी गंभीर स्थितीत आहेत. आतापर्यंत ५६७ जणांची ससून रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २३ रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्या वेळी मृतावस्थेतच होते. आतापर्यंत बी. जे. मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत ३४ हजार २८७ नमुने तपासण्यात आले.

आतापर्यंत एकूण दाखल झालेले करोनाचे रुग्ण- ८,७८०

रुग्ण- १,७५४

करोनाचे संशयित रुग्ण- ७,०२६

बरे होण्याचे रुग्णांचे प्रमाण- ५७ टक्के

आतापर्यंत करोनाग्रस्तांचा मृत्यू- ५२३

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here