सोलापूर, प्रतिनिधी: सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील ( वय २४, राहणार तेलंगी पाछा पेठ, सोलापूर ) याने मंगळवारी हॉस्टेलच्या रूममधील फॅनला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अध्याप समजले नाही. करोना वॉर्डातील कामाचा ताण किंवा अन्य काही प्रकरण आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

डॉक्टर चैतन्य हा सर्वोपचार रुग्णालयात कोरोना वॉर्डात रुग्णांवर उपचार करत होता. सोमवारी रात्री कोरोना वॉर्डातील काम संपवून होटगी रोडवरील मुलांच्या हॉस्टेलमधील आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेला. मंगळवारी दुपारी त्याने रूममधील पंख्याला दोरीने फास घेतल्याचे दिसून आले. यानंतर त्याचा भाऊ देवल आणि सहकाऱ्यांनी त्याला खाली उतरवून तातडीने शासकीय रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच डॉक्टर चैतन्य याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. चैतन्य हा सोलापूर शहरातील असला तरी हॉस्टेलवरच राहत होता. त्याने नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने काय लिहून वगैरे ठेवले होते काय ? याचा तपास पोलीस करत आहेत. डॉक्टर बी. बी. आस्मा यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here