सर्वत्र राम नामाचा जयघोष
संध्या आरती होताच भजन सुरू झाले. सर्वत्र प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष सुरू होता. श्री राम जय राम जय जय जय राम, असे प्रतिध्वनी ऐकू यते होते. कुठे हनुमान चालीसा तर कुठे सुंदरकांड पाठ सुरू होते. प्रत्येक रस्ता, प्रत्येक इमारत, प्रत्येक कोपरा, प्रत्येक दिशा दिव्यांनी उजळून निघाली होती. नया घाट आणि राम की पैडीपासून ते हनुमानगडी या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी मातीचे दिवे प्रज्वलित केले गेले. लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या न्हाऊन निघाली. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. शरयू नदी पुलावरही रंगीबेरंगी दिवे लावले गेले होते. दिव्यांच्या तेजात शरयू नदीकाठचे दृश्य अतिशय मोहक आणि भक्तीमय झाले होते.
पंतप्रधान मोदी तीन तास अयोध्येत थांबतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी () या कार्यक्रमासाठी अयोध्येत एकूण ३ तास असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिपूजन आणि मंदिराच्या पायाभरणीपूर्वी हनुमानगढी येथे पूजा करतील. प्रभू रामाची कोणतीही कामे हनुमानाजीच्या आशीर्वादाशिवाय सुरू केली जात नाहीत, असं मान्यता आहे. यामुळे पीएम मोदी प्रथम हनुमानाची पूजा करतील आणि त्यानंतर भूमिपूजनासाठी जातील.
अयोध्येत पीएम मोदींचा कार्यक्रम
– ५ ऑगस्ट रोजी सकाळी दिल्लीहून प्रस्थान
– सकाळी ९.३५ वाजता विशेष विमान दिल्लीहून उड्डाण करेल
– लखनऊ विमानतळावर सकाळी १०.३५ वाजता लँडिंग
– सकाळी १०.४० वाजता हेलिकॉप्टरहून अयोध्याला रवाना होतील
– सकाळी ११.३० वाजता अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लँडिंग
– सकाळी ११.४० वाजता हनुमानगढीला पोहोचतील आणि १० मिनिटं पूजा करतील
– दुपारी वाजता रामजन्मभूमी परिसरात पोहोचतील
– १० मिनिटांत विराजमान रामलल्लाचे दर्शन आणि पूजा
– दुपारी १२.१५ वाजता रामलल्ला परिसरात पारिजात वृक्षारोपण
– दुपारी १२.३० वाजता भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन
– दुपारी १२.४० वाजता राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम
– दुपारी २:०५ वाजता साकेत कॉलेज हेलिपॅडसाठी रवाना होतील
– हेलिकॉप्टर दुपारी २:२० वाजता लखनऊला उड्डाण करेल
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I really like and appreciate your blog post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.