17 year old youth drown in godavari river, मित्रांसह पोहताना पाण्याचा अंदाज चुकला, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, वैद्यकीय क्षेत्रात भरारीचं स्वप्न अधुरं – 17 year old youth drown in godavari river while swimming in nashik
नाशिकः मित्रांसोबत गोदावरी नदीतील गांधी तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सहर्ष राजेंद्र भालेराव (वय-१७, राहणार दातीर मळा, सिद्धेश्वर नगर, अंबड) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सहर्ष भालेराव हा शुक्रवारी त्याच्या चार ते पाच मित्रांसोबत पंचवटीत असलेल्या रामकुंड येथे आला होता. दुपारी भालेराव आणि त्याचे मित्र गोदावरी नदीवरील गांधी तलावात पोहोण्यासाठी उतरले. मात्र, नदीला पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू होता. यावेळी वाहते पाणी असल्याने भालेराव आणि त्यांच्यासह अन्य एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्यामुळे दोघे जण पाण्यात बुडाले. यावेळी सहर्ष सोबत असलेल्या एकाला पाण्याबाहेर सुखरूप काढण्यात यश आलं आहे.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू
मात्र, यावेळी दुर्दैवाने सहर्ष भालेराव पाण्यात बुडाला. पाण्याबाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा पाण्यात शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. यावेळी तात्काळ जीवरक्षक दलाचे जवानांनी तलावात उड्या मारून भालेराव याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखलही केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. सतरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने भालेराव परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बायकोचा निर्घृण खून केला, मग रात्रभर तिच्याच जवळ झोपला, धक्कादायक घटनेने खळबळ दरम्यान, या घटनेत मृत्यू पावलेला सहर्ष भालेराव हा केटीएचएम महाविद्यालयात बारावी विज्ञान विभागात शिक्षण घेत होता. त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. पुढे वैद्यकीय क्षेत्रात भरारी घेण्याचे त्याचे स्वप्न होते. परंतु या दुर्दैवी घटनेने त्याचे स्वप्न अपुरेच राहिले.पो हण्याचा छंद जोपासणे नाशिक मधील सतरा वर्ष मुलाला महागात पडले आहे. त्याला आपला जीवच गमवावा लागला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.