नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चने दोन महिन्याभरापूर्वी दिलेल्या दणक्यातून अदानी समूह अजूनही सावरण्याचा प्रयत्न करत आहे. देशांतर्गत बाजारात शेअर्सच्या घसरणीसोबत अदानी समूहाने अनेक प्रकल्प देखील आपल्या हातून सोडून दिले. या दरम्यान, अलीकडेच अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या झोळीत आणखी एक बंदर येऊन पडले आहे. अदानी पोर्ट आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ), या अदानी समूहाच्या कंपनीने कराईकल बंदर १,४८५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. कंपनीने म्हटले की एनसीएलटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी हा करार पूर्ण केला आहे.

Adani Crisis: गौतम अदानींच्या अडचणी वाढल्या; आता SEBI इन ॲक्शन मोड, पाहा नवीन घडामोड
कराईकल बंदर हे पुद्दुचेरी येथे स्थित सर्व हवामानातील खोल पाण्याचे बंदर आहे. यात पाच कार्यात्मक बर्थ, तीन रेल्वे साइडिंग, ६०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन आणि २.१५ कोटी मेट्रिक टन मालवाहतूक क्षमता असून यासह आता अदानी समूहाच्या मालकीच्या बंदरांची संख्या १४ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे अदानी समूहाने दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत कराईकल बंदर ताब्यात घेतले. यासाठी वेदांत लिमिटेड, जेएसडब्ल्यू इन्फ्रा, जिंदाल पॉवर आणि आरकेजी फंड आणि सॅगॅशियस कॅपिटल या कंपन्यांनी देखील स्वारस्य दाखवले होते, मात्र अखेरीस अदानींनी बाजी मारली.

अदानी आर्थिक व्यवहाराबाबत राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? शरद पवारांनी स्पष्ट करून टाकलं!
हिंडेनबर्गचा घाव
२००९ मध्ये कराईकल बंदराची स्थापना झाली, जे तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या दक्षिणेस ३०० किमी अंतरावर आहे. चेन्नई आणि तुतीकोरीन दरम्यान असलेले हे एकमेव मोठे बंदर असून तामिळनाडूच्या मध्यवर्ती भागात असलेल्या उद्योगांना सहज प्रवेश आहे. २४ जानेवारीला हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाचे अनेक प्रकल्प सोडावे लागले. समूहाने आपला विस्तार मागे टाकत कर्ज फेडण्याला जास्त प्राधान्य दिले होते. हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूहावर शेअर्सच्या किमतींशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, समूहाने सर्व आरोप फेटाळले होते, पण यामुळे महिन्याभराहून अधिक काळ शेअर्सची गळती सुरूच राहिली.

हिंडेनबर्ग अहवाल अन् अदानी साम्राज्य आपटला, दोन वर्षाची घोडदौड थांबली; शेअर्सची चमक पडली फिकी
अदानी समूहातील पोर्ट्स

कराईकल बंदर ताब्यात घेतल्यानंतर अदानी समूहाकडे आता देशभरात १४ बंदरे झाली असून हे बंदर तामिळनाडूच्या औद्योगिक केंद्रांजवळ आहे. तर याच्या जवळ एक मोठी रिफायनरीही बांधली जात आहे. करण अदानी म्हणाले की, बंदरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी कंपनी ८५० कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी लॉजिस्टिक खर्चात कपात होईल. येत्या पाच वर्षांत त्याची क्षमता दुप्पट करण्याचे लक्ष्य घेऊन आम्ही काम करत आहोत, असे त्यांनी म्हटले. यासोबतच त्यात कंटेनर टर्मिनलही जोडून ते बहुउद्देशीय बंदर बनवण्यात येणार आहे.

संसदेत अदानी प्रकरण गाजलं; विरोधी खासदारांचं संसदेच्या व्हरांड्यात बॅनर झळकवत आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here