मुंबई : सौदी अरेबिया आणि ओपेक प्लस देशांनी अलीकडेच पुढील महिन्यापासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज सुमारे १.१६ दशलक्ष बॅरल कपात करण्याची योजना जाहीर केली. त्यानंतर आज सकाळपासून सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती ५% हून अधिक वाढल्यामुळेच सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, शुक्रवारच्या तुलनेत आज, आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी म्हणजेच ३ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत.

भारतीय सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमतीत घट नोंदवली गेली. सोन्याचा भाव ५९ हजार रुपये १० ग्रॅमच्या पार असून चांदीचा भावही ७१ हजार रुपयांच्या पार पोहोचला आहे. राष्ट्रीय पातळीवर ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याचा भाव ५९ हजार २५१ रुपये प्रति १० ग्रॅम तर ९९९ शुद्धतेच्या चांदीसाठी खरेदीदारांना ७१, १७३ रुपये प्रति किलो मोजावे लागतील. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार २४ कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवार संध्याकाळी ५९,७५१ रुपये प्रति १० ग्रॅमवर क्लोज झाला होता. अशाप्रकारे आज शुद्धतेच्या आधारे सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे.

Gold Hallmark: सोन्याच्या हॉलमार्किंगबाबत मोठी अपडेट! सुवर्णकार आणि ज्वेलर्सना मोठा दिलासा!
MCX वर सोन्या आणि चांदीचा आजचा भाव
आज म्हणजे ३ एप्रिल रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोन्याचे फ्युचर्स घसरणीसह उघडले आणि देशांतर्गत बाजारात ५९ हजार ०६० रुपये प्रति १० ग्रॅम या नीचांकी पातळीवर पोहोचले. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ०.९०% घसरून $१,९५० प्रति औंसच्या पातळीवर पोहोचला. बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण झाली तर चांदीची किंमतही गडगडली. मे २०२३ डिलिव्हरीसाठी असलेल्या चांदीचा फ्युचर्स ७१,८११ रुपये प्रति किलोवर उघडला आणि बाजार उघडताच काही मिनिटात ७१,४३७ रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत २% हून अधिक घसरणीसह २३.५८ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर पोहोचली.

या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

सोने आणि चांदी गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी
सोन्या-चांदीच्या गुंतवणूकदारांनी ‘बायिंग ऑन डिप्स’ हे धोरण कायम ठेवावे. येत्या काही काळात आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशातील सण-उत्सवाच्या काळात सोन्या-चांदीचे भाव आणखी वाढतील, अशा स्थितीत जर भाव खाली आले असतील तर त्यांनी आता सोने खरेदी करून गुंतवणूक करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here