बुलढाणा: काळाराम मंदिरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत जो प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघ करत असल्याचं अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे. राम नवमीनिमित्त संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. मात्र, या पूजेवरून वाद निर्माण झाला आहे. मंदिराच्या महंतांनी पूजा पुराणोक्त पद्धतीनं करण्यास सुरुवात केल्यानंतर संयोगीताराजे छत्रपती यांनी या पूजेला विरोध केला. त्यांनी महंतांना पूजा वेदोक्त पद्धतीनं करण्यास सांगितले. मात्र, त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न महंतांनी केल्याचा दावा संयोगीताराजे छत्रपती यांनी केला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट देखील टाकली होती. या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. आता या वादात मराठा सेवा संघाने देखील उडी घेतली आहे.

संयोगिता राजे छत्रपतींनी खडे बोल सुनावले, काळाराम मंदिरातील ‘तो’ पुजारी आता शाहू महाराजांना भेटणार

मराठा सेवा संघाकडून निषेध

नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत जो प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघ करत असल्याचं अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं आहे. तसेच आता मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे, ब्राह्मणांच्या ऐवजी मंदिरात बहुजन सामजातील मुला-मुलींची नियुक्ती करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. खेडेकर यांच्या या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संयोगिताराजेंचं कौतुक, महंतांनी कोल्हापूरला यावंच, तिथे काय घडलं सांगतो: संभाजीराजे छत्रपती

राज्यातील मंदिरातील ब्राह्मण पुजारी हटवा: पुरुषोत्तम खेडेकर

नाशिक येथील काळाराम मंदिरातील पुराणोक्त वेदोक्त प्रकरणानंतर मराठा सेवा संघाने जाहीर केली भूमिका. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी राज्यातील सर्व मंदिरांमधून ब्राह्मण पुजारी हटवण्याची मागणी केली. सर्व मंदिर भटमुक्त करून मंदिरांचे राष्ट्रीयीकरण करा, असे त्यांनी म्हटले. देवस्थांनांचा पैसा गरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी वापरावा. मंदिर भटमुक्त करण्यासाठी पुढील काळात राज्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचे खेडेकर यांनी म्हटले.

नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here