वाशिम : समृद्धी महामार्गावरुन नागपूरकडे जाणाया कारने ट्रकला मागून जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन महिला डॉक्टरांसह एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील कोटंबा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावचे शिक्षक भारत क्षीरसागर व त्यांची मुलगी डॉ. ज्योती भारत क्षीरसागर व ज्योतीची मैत्रीण डॉ. फाल्गुनी सुरवाडे (रा. अमरावती) अशी मृतांची नावं आहेत. डॉ. ज्योती व डॉ. फाल्गुनी या दोघीही दंत चिकित्सक असून तिघेही एम.एच. ३७ जी. ३५५८ क्रमांकाच्या कारने नागपूरला जाण्यासाठी निघाले होते.

त्यांची कार अकोला येथील इंटरचेंजवरुन समृद्धी महामार्गावर चढली. ही भरधाव कार सेलू तालुक्यातील कोटंबा फाट्याजवळ समोरील एम.एच.०४ डी.एल. ८२३५ क्रमांकाच्या ट्रकवर आदळली. धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. यात कारमधील तिघेही जागीच ठार झाले.

हे बाळ माझ्या मुलाचं नाही, सासूचे शब्द ऐकून सुनेने जीवन संपवलं; सासरच्यांनी चिमुकलीला नेलं
अपघाताची माहिती मिळताच जाम पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

पोलीस वडील दंगलीतून सुखरुप घरी परतातच हंबरडा फोडत मुलीने मारली मिठी

भारत क्षीरसागर हे मुंगळा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असून त्यांच्या पत्नी मालेगाव येथील ना. ना. मुंदडा माध्यमिक शाळेवर शिक्षिका आहेत. ज्योती व फाल्गुनी या नागपूर येथे उच्च शिक्षण घेत असून त्यांना सोडण्यासाठी भारत क्षीरसागर हे नागपूरला जात होते. बाप लेकीच्या अशा अपघाती जाण्याने मुंगळा गावावर शोककळा पसरली आहे.

ड्युटीवर निघाली पण पोहोचलीच नाही, २६ वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here