बेंगळुरूः विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघावर आठ विकेटने मात केली. सलामीच्या सामन्यातच मुंबईला पराभवाला सामना करावा लागल्यामुळं कर्णधार रोहित शर्माला स्टार खेळाडूची कमी भासवत असल्याचं बोलून दाखवलं आहे. तिलक वर्माच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७१ धावा केल्या. मात्र, त्यानंतर गोलंदाजांना बेंगळुरुच्या फलंदाजांना रोखण्यात यश आलं नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिसने सुरुवातीपासूनच फटकेबाजीला केली. या जोडीने पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांत ५३ धावा केल्या. या जोडीने बेंगळुरुचा डाव सावरत मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. मुंबईच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने बुमराहची कमी जाणवतेय, अशी खंत बोलून दाखवली.
RCB vs MI IPL 2023: मुंबईच्या संघाला अडचणीतून बाहेर काढणाऱ्या ‘त्या’ दोन खेळाडूंना विराटकडून बॅटिंगच्या टिप्स
जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या दुखापतीमुळं त्रस्त आहे. त्यामुळं तो यंदाच्या आयपीएलमधूनही बाहेर आहे. यावर रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या सहा-आठ महिन्यात आम्हाला बुमराहशिवाय खेळण्याची सवय झाली आहे. अर्थात हा वेगळा सेटअप आहे. पण कोणीतरी पुढे येणे गरजेचं आहे. दुखापती होणं हे आमच्या नियंत्रणात नाही. आम्ही त्याबाबत काही करु शकत नाही. संघातील इतर खेळाडूदेखील प्रतिभावन आहेत. आपण त्यांच्याकडबनही अपेक्षा ठेवू शकतो तसंच, त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. आयपीएलच्या मोसमातील हा पहिलाच सामना होता. इतर आगामी सामन्यांसाठी आम्ही उत्सुक आहोत, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

मुंबई इंडियन्सला एकहाती तारणारा हा तिलक वर्मा आहे तरी कोण, जाणून घ्या संपूर्ण माहिती…
दरम्यान, जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखापतीमुळं त्रस्त आहे. न्यूझीलंडमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपपूर्वी बीसीसीआय बुमराहला पुन्हा संघात संधी देऊ शकते, अशी शक्यता आहे.

VIDEO | उडता डुप्लेसिस पाहिलात का? हवेत उडी घेत जबरदस्त कॅच, बंगळुरुकडून मुंबईचा धुव्वा

कोहली ताफ्यात सामील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here