ओदिशा वरुन नाशिकला जाणाऱ्या या रुग्णवाहिका चालक सूर्यवंशी यांनी हे सारं पाहिलं. “सूर्यवंशी म्हणाले की, ओदिशाला १,४५० किमी चालवल्यानंतर आणि नाशिकला परत आल्यानंतर मी थकलो होतो आणि मला झोप येत होती. मी एका टोल बुथजवळ वाहन थांबवले आणि जरा वेळ आराम करत होतो. सकाळी ७ च्या सुमारास मला जाग आली. तेव्हा मला विरुद्ध दिशेनं एक भरधाव कार येताना दिसली. आम्ही पलीकडे गेलो आणि पाहिले की माकडाचं पिल्लू त्याच्या आईच्या छातीला चिकटून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. त्या पिलाला उभं देखील राहता येत नव्हतं. आई काहीच प्रतिसाद देत नसल्याने हे पिल्लू कासाविस झालं होतं.”
मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ, ट्रॅव्हल्सवाल्यांचा संताप
“माकडिणीची प्रकृती गंभीर होत चालली होती. मी वेळ न घालवता बाळाला उचलले आणि आमच्या रुग्णवाहिकेत असलेल्या रॅपरमध्ये त्याला ठेवले. आम्ही टोल बूथवरून वन कर्मचाऱ्यांचे नंबर मिळवले आणि त्यांना फोन केला. जेव्हा दुसऱ्या टोल बुथवर पोहोचलो तेव्हा वनपालांनी माकड आणि बाळाला पिपरी (मेघे) येथील पीपल फॉर अॅनिमलस (पीएफए) संचालित ‘करुणाश्रमा’मध्ये हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर माकडिण आणि बाळाला टोल बुथपासून ३-४ किमी अंतरावर असलेल्या पीएफए केंद्रात नेले”, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली.
पीएफए सदस्य कौस्तुभ गावंडे म्हणाले, “माकडिणीचा प्रकृती गंभीर होती आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. बाळाला खरचटलही नव्हतं, परंतु त्याची आई नाही, याचा त्याला धक्का बसला. वन्यजीव पशुवैद्य डॉ. संदीप जोगे हे या पिलावर भावनिक उपचार करत आहेत”