लखनौ : ४५ वर्षांची मामी २४ वर्षीय भाच्याच्या प्रेमात पडली. दोघांचे काही काळ अनैतिक संबंध सुरु होते. मात्र नंतर मामीला भाच्यापासून सुटका करुन घेण्याची इच्छा झाली. परंतु भाच्याला मामीचा डाव लक्षात आला आणि त्याने तिचे अश्लील फोटो व्हायरल केले. मामीला अडकवण्याचा कट भाच्याच्याच अंगलट आला आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात प्रेमनगर येथील बल्लमपूर भागात हा प्रकार घडला आहे. मामीने प्रेमसंबंध तोडल्याचा राग आल्याने तरुणाने आपल्या अपहरणाची खोटी कहाणीही रचली. गुरुवारी पोलिसांनी या तरुणाला अटक केली. मामीवर बलात्कार करत तिचे अश्लील फोटो व्हायरल केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात रवानगी केली.

प्रेम नगर येथे राहणारा २४ वर्षीय तरुण गुरुग्राममध्ये खाजगी सुरक्षा रक्षक होता. काही वर्षांपूर्वी त्याचे सख्ख्या मामीसोबत प्रेमसंबंध जुळले. मामी त्याच्या वयाच्या दुप्पट (४५ वर्ष). मात्र गेल्या काही महिन्यांपासून मामी त्याच्यापासून सुटका करु लागली होती. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. अखेर पीडित मामीने प्रेमनगर पोलिस ठाण्यात भाच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.

या कारणामुळे संतापलेल्या तरुणाने मामीला धडा शिकवण्याचा प्लॅन आखला. त्याने स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला आणि आठ मार्च रोजी तो बेपत्ता झाला. यानंतर ९ मार्च रोजी त्याने मामीच्या भावाचा फोन चोरला आणि या मोबाईलवरून आपल्या नातेवाईकांना अपहरणाचा संदेश पाठवला.

अपहरणकर्ता असल्याचं भासवून त्याने एक लाख रुपयांची खंडणी मागितली. मेसेज पाहून तरुणाच्या पालकांनीही त्याचा शोध सुरू केला. मात्र कुठेच थांगपत्ता न लागल्याने १७ मार्च रोजी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे जाऊन कैफियत मांडली.

नाईट ड्रेसमध्ये सेल्फी, हनीट्रॅपमध्ये अडकवत ब्लॅकमेल; पुण्यात व्यावसायिकाकडून १७ लाख उकळले
दुसरीकडे, तरुणाने पोलिसांना फोन करून अपहरणामागे आपल्या मामीचा हात असल्याचे सांगितले. यानंतर २० मार्च रोजी मामीच्या भावाच्या फोनवरून पोलिस अधिकाऱ्यांना अपहरणाचा संदेशही आला होता. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

पोलीस भरतीची लेखी परीक्षा पारदर्शक; खुल्या मैदानावर बैठक व्यवस्था तर 20 पेक्षाही अधिक कॅमेरे तैनात

तरुणाच्या शोधासाठी पाळत ठेवणारे पथकही तैनात करण्यात आले होते. माहिती मिळाल्यावर बिजौली चौकीचे प्रभारी अश्वनी दीक्षित यांनी गुरुवारी झाशी ललितपूर हायवे दिल्ली रोडजवळ कॉन्स्टेबलसह जाऊन आरोपी तरुणाला अटक केली.

हे बाळ माझ्या मुलाचं नाही, सासूचे शब्द ऐकून सुनेने जीवन संपवलं; सासरच्यांनी चिमुकलीला नेलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here