मुंबई : उदयशिवकुमार इन्फ्राचे शेअर्स सोमवारी शेअर बाजारात लिस्ट झाले. या शेअर्सने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. कंपनीचा शेअर्स एनएसई (राष्ट्रीय शेअर बाजार) वर ३० रुपयांवर लिस्ट झाला असून कंपनीच्या प्रवर्तकांनी या आयपीओसाठी प्रती शेअर ३५ रुपये किंमत निश्चित केली होती.आयपीओला चांगला प्रतिसाद
उदयशिवकुमार इन्फ्राच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा ३० पट प्रतिसाद मिळाला. कंपनीने या आयपीओअंतर्गत दोन कोटी शेअर्ससाठी बोली मागवल्या होत्या. मात्र, गुंतवणूकदारांनी एकूण ६१.२६ कोटी शेअर्ससाठी बोली लावली होती. बिगर संस्थात्मक खरेदीदारांच्या श्रेणीमध्ये हा आयपीओ ६०.४२ पट सबस्क्राइब झाला. पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या श्रेणीमध्ये ४०.४७ पट, किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीमध्ये १४.१० पट सबस्क्रिप्शन मिळाले.

चालू आठवड्यात मार्केट दोन दिवस बंद; ‘या’ घडामोडी बाजाराची दिशा ठरवणार, गुंतवणूकदारांनो तयार रहा!
ग्रे मार्केटमध्ये प्रतिसाद
लिस्टिंगपूर्वी उदयशिवकुमार इन्फ्राचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ७-८ रुपयांच्या प्रीमियमसह उपलब्ध होते. यावरून असे संकेत मिळत होते की, या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळेल. याचे दुसरे कारण म्हणजे या आयपीओला मिळालेला भरघोस प्रतिसाद. मात्र, या आयपीओने लिस्टिंगच्या वेळी गुंतवणूकदारांची निराशा केली आहे.

सावध सुरुवाती दरम्यान प्राईस व्हॉल्युमसह हे ठरले ब्रेकआउट नोंदविणारे स्टॉक
कंपनीबद्दल जाणून घ्या
उदयशिवकुमार इन्फ्रा राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसह विविध रस्ते प्रकल्पांच्या बांधकामात गुंतलेली आहे. याशिवाय कंपनी पीएम स्मार्ट सिटी मिशन प्रकल्पांतर्गत जिल्हा रस्ते आणि स्मार्ट रस्ते तयार करते. कंपनीकडे सध्या १२९१ कोटी रुपयांच्या ४६ वर्क ऑर्डर आहेत. यापैकी ३० प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर १६ प्रकल्पांचे काम सुरू व्हायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here