मुंबई : कोणतीही खरेदी आपल्या ताब्यात घेण्यासाठी अशी मनोरंजक शर्यत पाहायला मिळालेली नव्हती. बाटलीबंद पाण्याच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी, बिस्लेरी खरेदीचा करार मध्यावर येऊन रखडल्यावर आता टाटा समूह आता ‘देसी’ चायनीज कंपनी ताब्यात घेण्यासाठी नेस्ले, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, क्राफ्ट हेन्झ, ओरक्ला आणि निसिन यासारख्या कंपन्यांविरुद्ध शर्यतीत उतरली आहे. ही कंपनी दुसरी कोणी नसून कॅपिटल फूड प्रायव्हेट लिमिटेड आहे, जी चिंग्स सीक्रेट स्मिथ अँड जोन्स ब्रँड अंतर्गत चायनीज फूड घरी बनवण्यासाठी मसाले तयार करते. कंपनी खरेदीचा करार सुमारे १ ते १.२५ अब्ज डॉलर्समध्ये होऊ शकतो.कोणाचा किती हिस्सा
कॅपिटल फूड्सच्या तीन मुख्य शेअरहोल्डर्सनी गेल्या वर्षाच्या अखेरीस कंपनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला. कॅपिटल ग्रुपची इनव्हस ग्रुपमध्ये ४०%, यूएसस्थित प्रायव्हेट इक्विटी ग्रुप जनरल अटलांटिकमध्ये ३५ टक्के आणि कॅपिटल फूड्सचे संस्थापक अध्यक्ष अजय गुप्ता यांची २५% हिस्सेदारी आहे. कंपनीच्या विक्रीची पहिली बातमी १४ नोव्हेंबर रोजी समोर आली.
गौतम अदानींनी मारली बाजी… बंदर उद्योगात समूहाचा मोठा डाव, इतक्या कोटींची झाली डील
कोणत्या कंपन्यांमध्ये शर्यत
घरच्या घरी चायनीज जेवण बनवण्यासाठी प्रसिद्ध चिनी मसाले बनवणारी कंपनीचा ताबा मिळवण्यासाठी टाटा समुहाचा जगातील सर्वात मोठा फूड ग्रुप नेस्ले एसए, ITC, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, जपानी इन्स्टंट नूडल बहुराष्ट्रीय कंपनी निसिन फूड्स, नॉर्वेची ओरक्ला आणि जगातील पाचवी सर्वात मोठी खाद्य आणि पेय कंपनी क्राफ्ट हेन्झ यांच्यात स्पर्धा रंगली आहे.

Adani Crisis: गौतम अदानींच्या अडचणी वाढल्या; आता SEBI इन ॲक्शन मोड, पाहा नवीन घडामोड
कसा होणार करार
एमटीआर आणि ईस्टर्न कंडिमेंट्सच्या पॅकेज्ड फूड व्यवसायाची मालकी ओरक्लाकडे असून बर्‍याच संभाव्य खरेदीदारांनी आधीच व्यवस्थापनासोबत बैठका घेतल्या आणि इतर मे महिन्याच्या सुरुवातीला नॉन-बायंग बिड बनवण्याआधी काम करत आहेत. नेस्ले, एचयूएल, आयटीसी आणि टाटा कंझ्युमर यांनी बाजाराच्या अटकळांवर भाष्य करण्यास नकार दिला.

Air India : ६८ वर्षांनी एअर इंडिया पुन्हा टाटांकडे; सरकारनं केलं शिक्कामोर्तब

किशोर बियाणी पहिले गुंतवणूकदार
अजय गुप्ता यांनी १९९५ मध्ये ‘देसी’ चायनीज आणि इटालियन पोर्टफोलिओसह कॅपिटल फूड्स लाँच केले असून या रेंजमध्ये चिंग्स सीक्रेट इन्स्टंट चायनीज नूडल्स, सूप, मसाले, करी पेस्ट आणि फ्रोझन एन्ट्री, तसेच आले लसूण पेस्ट, सॉस आणि बेक्ड बीन्सची स्मिथ आणि जोन्स श्रेणी समाविष्ट होती. तर या कंपनीला सर्वप्रथम किशोर बियाणी यांनी पाठिंबा दिला होता. किशोर बियाणी यांनी १३ कोटी रुपयांना कॅपिटल फूड्समधील ३३% भाग खरेदी केला पण ते २०१३ मध्ये कंपनीतून बाहेर पडए. त्यानंतर, २०१८ मध्ये जनरल अटलांटिकने बोर्डात एन्ट्री घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here