अकोला :कापसाच्या दरात मार्चअखेरीस वाढ होताना दिसून आलं होतं. आता हाच कापूस दरवाढीचा ट्रेंड एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कायम असल्याचं दिसत आहे. कारण अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी बाजारात आज कापसाच्या दरात तब्बल १८० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कापसाचे दर ८ हजार ६०५ रूपयांपर्यंत पोहोचले आहे. मात्र अकोल्यासह अकोटच्या बाजारात तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

मागील हंगामात मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात चांगली वाढ झाली होती. यावर्षी देखील मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु, मार्च महिन्यात कापसाची दरवाढ अपेक्षेप्रमाणं दिसून आली नाही.

नंदुरबारचे शेतकरी केळी उत्पादनात अग्रेसर, ५०० टन केळी जगाच्या बाजारात, दररोज कोट्यवधींची निर्यात सुरु

आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कापसाच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, आज ३ एप्रिल रोजी विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात १८० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान २९ मार्चला ७ हजार ८०० पासून ८ हजार ४२५ इतका कापसाला भाव मिळाला होता. सोमवारी कापसाचे दर आणि आवकही वाढली असून ८ हजार ते ८ हजार ६०५ रूपये प्रतिक्विंटल मागे कापसाला भाव मिळाला आहे. तर २ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. दरम्यान अकोल्याच्या बाजारात कापूस खरेदी आज बंद होती.

Arjun Tendulkar IPL 2023: १७ कोटींचा ग्रीन ५ धावा करतो मग अर्जुनमध्ये काय कमी? पराभवानंतर मुंबई इंडियन्सला घरचा आहेर

अकोल्यात तुरीचे दर ३४५, अकोटमध्ये १६० रुपयांनी घसरले

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्चमध्ये मध्यंतरी तुरीला चांगला भाव मिळाला. तुरीला भाव वाढत असताना अचानक मार्च महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २९ मार्च रोजी तुरीच्या भावात १७० रुपयांनी घसरण झाली आहे. परंतु, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला देखील तुरीच्या दरात घसरण कायम राहिली. आज सोमवारी म्हणजेच ३ एप्रिल रोजी अकोल्यात तुरीचे दर ३४५ रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे ७ हजार पासून ८ हजार ४५० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव मिळाला. पण आवक खूप कमी होती. इतकंच नव्हे तर अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील तुरीचे दर १६० रुपयांनी घसरले आहेत. आज ८ हजार पासून ८ हजार ६०५ रूपयांपर्यत तुरीला प्रतिक्विंटल मागे भाव मिळाला. परंतु अकोल्याच्या बाजारात तुरीला मिळत असलेला दर अकोटच्या बाजार तुलनेत १५० रुपयांनी कमी होता.

मंत्री उदय सामंत, संभाजीराजेंची स्पीड बोट भरकटली; अलिबागच्या किनाऱ्यावर मोठा अनर्थ टाळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here