राजाराम साहेबराव जाधव (रा. कशाळ भोईरे, मावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जाधव यांची सासू सखुबाई गबळू लंके (वय-६५, रा. न्यु तुंगार्ली, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी राजाराम जाधव व फिर्यादी यांची मुलगी अनिता याचे २५ वर्षापुर्वी लग्न झाले आहे. लग्न झाल्यापासून जाधव हा बायकोला मारहाण करत असल्याने लग्नानंतर साधारण दिड वर्षापासून ती माहेरी निघून आली. तेव्हापासून ते वेगळे राहत आहेत. असे असले तरी राजाराम जाधव हा सासरवाडीत येऊन अनिता यांना शिविगाळ व मारहाण करायचा.
आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजाराम जाधव हा हातात कोयता घेऊन सखुबाई व अनिता माळीकाम करत असलेल्या बंगल्यात गेटवरुन उडी मारुन आत घुसला, त्याने प्रथम सासूवर व नंतर अनितावर जिवघेणा हल्ला केला. त्याने अनिताच्या चेहर्यावर व हातावर सपासप वार करत तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार फिर्यादी मुलगा रामचंद्र लंके याने लोणावळा शहर पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल कसबेकर, पंढरीनाथ कामठे, बंटी कवडे, भरत मोरे हे सरकारी गाडीतून तर वाहतुक हवालदार विजय जांभळे व रविंद्र सरसे हे दुचाकीवरुन अवघ्या पाच मिनिटात घटनास्थळावर पोहोचले व त्यांनी आरोपी राजाराम याच्या तावडीतून सखूबाई व सुषमा यांची सुटका करत रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलीस जीपमधून अनिता यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times