सातारा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी रविवार, दि. ११ जून २०२३ रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण पाच मुक्काम असणार आहेत, अशी माहिती देणारं वेळापत्रक जाहीर झालं होतं. त्यायमध्ये लोणंदमध्ये दोन, तर फलटण तालुक्यात तीन मुक्काम होणार आहेत, अशी माहिती असणारं वेळापत्रक सातारा जिल्ह्यात व्हायरल झालं होतं. याबाबत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा संस्थेचे पदाधिकारी माऊलींचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार यांच्याशी संपर्क साधला असता अधिकृत असे कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही, असं त्यांनी सांगितलं. पालखी सोहळ्याच्या तयारीसंदर्भात एक बैठक पार पडल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

साताऱ्यात असा असतो माऊलींच्या पालखीचा मार्ग

पुणे जिल्ह्यातून पालखी सोहळा नीरा नदी ओलांडून सातारा जिल्ह्यात दाखल होतो. माऊलींच्या पालखीचं नीरा स्नान आणि आरती होते. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होते. यानंतर पालखी सोहळा रात्री लोणंद येथे हा सोहळा मुक्कामी असतो.

कोहलीने एका वाक्यात मुंबई व चेन्नईला सुनावलं, ‘ तुम्ही जेतेपदं जिंकली असतील पण विसरू नका..’

राम जन्मला गं सखे…. राम नामानं दुमदुमलं काळाराम मंदिर

लोणंद येथील मुक्कामानंतर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान तरडगाव (ता. फलटण) येथे होते. तिथं पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. साताऱ्यातील एकमेव असं पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे पार पडतं. यानंतर माऊलींचा पालखी सोहळा फलटणकडे प्रस्थान करतो. वाटेत सुरवडी, निंभोरे, वडजल येथे विसाव्यासाठी पालखी काही वेळ थांबतो. त्यानंतर सायंकाळी सोहळा पालखी फलटण विमानतळावर मुक्कामी असतो. यानंतर पालखी सोहळा बरडनंतर पुढे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो.

विहिरीचं काम सुरु, अचानक वरचा भाग ढासळला, ५ कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली, दोघांना बाहेर काढलं

पालखी सोहळा सुरु होणार असल्याची तारीख समजल्यानं दिंडी चालक-मालक यांची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. माउलींचा पालखी सोहळा यावर्षी मोठा होणार असल्याचा अंदाज आहे. यंदा मोठ्या संख्येनं वारकरी वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यात नीरा स्नानानंतर पालखीचे आगमन होते, तर बरडच्या सीमेवर धर्मपुरीजवळ पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो. पायी वारी सोहळ्याने भाविकांसाठी एक नवे चैतन्य निर्माण होते. अनेक वारकरी या सोहळ्यात सामील होण्यासाठी तयारी करू लागले आहेत.

थाटामाटात लग्न झालं, देवदर्शनावरुन येतानाच काळाचा घाला, अपघातात नवदाम्पत्य जागीच ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here