नांदेड : एका साडेतीन वर्षाच्या मुलाने अडीच इंचीचा लोखंडी खिळा गिळल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना चर्चेत असताना पुन्हा एका चार वर्षाच्या बालकाने तीन इंच आकाराची असलेली हनुमानाची धातूची मूर्ती गिळली. ही मूर्ती बालकाच्या अन्ननलिकेत अडकली. गॅलॅक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टरानी एन्डोस्कोपीद्वारे काही क्षणातच हनुमानाची मूर्ती बाहेर काढली आणि त्या बालकाला जीवनदान दिले. हा बालक हिंगोली जिल्ह्यातील आहे. मुलावर संकट येऊ नये म्हणून आई वडिलांनी त्याच्या गळ्यात तीन इंच आकाराची हनुमानाची मूर्ती घातली होती. रविवारी खेळता खेळता त्याच्या गळ्यातील मूर्ती गळून खाली पडली आणि त्या बालकाने चक्क हनुमानाची मूर्ती गिळली. हनुमानाची मूर्ती त्या बालकाच्या अन्ननलिकेत जाऊन अडकली होती. अडकलेल्या हनुमानामुळे त्या बालकाचा जीव गुदमरला होता. मुलाचा गुदमरलेला जीव पाहून पालकांना धक्का बसला होता. पालकांची धावपळ सुरू झाली.
साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याने लोखंडी खिळा गिळला, उलट्या थांबेनात; डॉक्टरांनी एन्डोस्कोपी करुन जीव वाचवला
हिंगोली येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर पालकांनी त्या बालकाला घेऊन खासगी गॅलॅक्सी हॉस्पिटल गाठले. घाबरलेल्या पालकांना रुग्णालयातील पोटविकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांनी धीर दिला. त्यानंतर तात्काळ उपचार करत एन्डोस्कोपीद्वारे अवघ्या एक ते दीड मिनिटात बालकाच्या अन्ननलिकेतून हनुमानाची मूर्ती बाहेर काढली. बालकाच्या अन्ननलिकेत अडकलेला हनुमान बाहेर काढल्यानंतर पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

नांदेडच्या तरुणानं खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंबाची बाग, पहिल्याच वर्षी २५-३० लाखांचं उत्पन्न मिळण्याची आशा

लहान मुले खेळताना तोंडात कधी काय घालतील याचा नेम नाही. एखादी वस्तू तोंडात चघळता चघळता ती घशात अडकते किंवा अन्ननलिकेत फसते. यामुळे मुलांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. कोणतीही वस्तू आपल्या बालकाच्या हातात देण्यापूर्वी अथवा त्याच्या गळ्यात बांधण्यापूर्वी त्या वस्तूमुळे त्याचे आरोग्य आणि प्राण धोक्यात येणार नाही ना? याची खबरदारी घेण्याची पालकांना गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here