koyta gang threatened to woman in dombivli east, भयंकर! डोंबिवलीत हातात कोयते घेऊन रस्त्यावर टोळीचा बेभान नाच, धुडगूस घालत महिलेला धमकावलं – koyta gang threatened to woman in dombivli east manpada police register case
डोंबिवली : कोयता हातात घेऊन पाच जणांनी डोंबिवली पूर्वेतील एक ज्येष्ठ महिला आणि तिचा आजारी पती यांच्या घरात घुसून धुडगूस घातला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली तर पुन्हा मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी रात्री घडली. या कोयता टोळीमुळे डोंबिवलीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जितू निषाद (वय ४०) हा कोयता टोळीचा प्रमुख असून त्याच्या सोबतीला पाच गुंड आहेत. जितू हा कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. या कोयता टोळी विरुद्ध बेबी मधुकर देसले (५२, रा. देसलेपाडा) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. शनिवारी रात्री १० वाजता तक्रारदार महिला बेबी आणि तिचा आजारी पती घरात एकटे होते. यावेळी अज्ञात पाच व्यक्ती हातात कोयते घेऊन दारावर आले. बेबी यांचा मुलगा मन्या याला ते धमकावत होते. तू घराबाहेर ये. तुला ठार मारतो, असे बोलत दरवाजावर लाथाबुक्का मारत आणि ओरड होते. हे पाच जण म्हणजे जितू निषाद हा गुंड आणि त्याचे साथीदार होते. ते हातात कोयते घेऊन आले होते. मुलगा घरात नाही, असे बेबी पाच जणांना खिडकीतून सांगत होत्या. तो घरातच आहे, असे बोलत जितूने महिलेला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. दरवाजा उघडला नाही तर आपण दरवाजा तोडून घरात घुसू, अशी धमकी त्याने दिली होती. बेबी यांनी दरवाजा उघडताच हातात कोयते नाचवत जितूने बेबी यांना मारहाण सुरू केली. त्यांच्यावर कोयता उगारण्यात आला. आता आपल्याला ठार मारले जाईल, या भीतीने बेबी यांनी बचावासाठी आरडाओरडा केला. तेव्हा शेजारी, पादचारी बेबी यांच्या घराकडे बचावासाठी धावले. त्यावेळी जितू आणि त्याच्या साथीदारांनी बचावासाठी आलेल्या नागरिकांना तुम्हीमध्ये पडलात तर तुम्हाला कोयत्याने मारू, अशी धमकी दिली. आणि टोळी हातात कोयते घेऊन रस्त्यावर नाचू लागली. बेभान झालेली टोळी घरात घुसेल या भीतीने परिसरातील रहिवाशांनी घराचे दरवाजे बंद केले. यामुळे बेबी यांच्या बचावासाठी कोणीही पुढे आले नाही.