विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणलेले नाही. शेतकरी संयमाचे धोरण ठेवत गरज असेल तेव्हढेच सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. मार्च अखेर पीक कर्ज भरण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सूचना केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणले. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी महिन्याभरासाठी उसने किंव्हा व्याजाने पैसे घेत पीककर्ज भरले आहे. आता एप्रिल महिन्यात पुन्हा कर्ज मिळाल्या नंतर ते परत केले जाईल.
सोयाबीनच्या दराने केली निराशा
कमी वेळेत जास्त नफा मिळवून देणारे सोपे पीक म्हणून सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यातच मागील दोन वर्षात सोयाबीनला चांगले दर सुद्धा मिळाले होते. मात्र, यावर्षी सुरुवातीपासूनच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. अपुऱ्या पावसामुळे उशिरा झालेली पेरणी, किडींचा वाढलेला प्रादुर्भाव, ऐन काढणीच्या वेळी झालेली अतिवृष्टी, घटलेले उत्पादन, वाढता खर्च आणि सातत्याने दरात झालेली घसरण यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता किमान या नव्या आर्थिक वर्षात तरी सोयाबीनची दरवाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
दरम्यान, सोयाबीन प्रमाणंच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी देखील कापूस घरीच ठेवला आहे. कापसाला गेल्या वर्षी १३ ते १४ हजारांच्या दरम्यान दर मिळाला होता. यावर्षी कापसाला ७५०० ते ८५०० दरम्यान दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
prasugrel 10 mg