नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार करून हत्या, तर कधी लव्ह इन रिलेशनशिपमधून हत्या असे एक ना अनेक हत्या केल्याच्या घटना घडतात. त्यातच बेलापूरमध्ये पतीने पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्यामुळे पतीने पत्नीचा गळा आवळला, नंतर चाकू भोसकून तिची हत्या केली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पती स्वतःहून पोलीस ठाण्यात आला आणि घडलेली घटना सांगितली. या घडलेल्या घटनेचा तपास करून पोलिसांनी जसपालसिंग मसुता (वय ३६ वर्षे) या व्यक्तीला अटक केली आहे.

बार्शीतील निर्भया प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकरांचा फोन पीडित कुटुंबाला फोन करून धीर

जसपाल सिंग मसुता, असे आरोपीचे नाव असून तो आपल्या पत्नीसोबत बेलापूर सीबीडी सेक्टर ४ येथे राहत होता. जसपालसिंग मसुता हा आखाती देशात कतार मध्ये नोकरी करतो आणि अधूनमधून घरी येत असतो. यावेळी तो जानेवारीत घरी आला होता. तेव्हापासून तो घरीच होता. रविवारी रात्री त्याचे आणि पत्नीचे काही कारणावरुन वाद झाला. या वादातून रागाच्या भरात भाजी चिरण्याच्या चाकूने त्याने पत्नीची हत्या केली.

बायकोच्या उपचाराचे पैसे दिले नाहीत, नवऱ्याची सटकली, मेहुण्यांवर वार, अन् मग
हत्या केल्यावर रविवारी त्याने स्वतः पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. घडलेला सारा प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. या माहितीची खात्री होताच रात्री नऊच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. हत्या नेमकी कुठल्या कारणाने झाली आणि वाद कशावरून झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे यांनी सांगितले.

संसार करत असलेल्या अशा अनेक महिलांना पतीच्या जाचाला सामोरे जावे लागते. मात्र, बेलापूरमधील क्षुल्लक वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून नंतर चाकू भोसकून हत्या केल्याने बेलापूरसह संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आई उठ ना, माकडिणीच्या मृतदेहाजवळ पिल्लाचा टाहो; रुग्णवाहिका चालकामुळे मिळाले जीवदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here