भुवनेश्वर : कुत्र्यांच्या बाबतीत बरेचदा दोन गट पाहायला मिळतात. एक म्हणजे ज्यांना या मुक्या प्राण्यांचा अत्यंत लळा लागलेला असतो, तर दुसरे म्हणजे कुत्र्याला घाबरुन लांब पळणारे. अर्थात पाळीव कुत्रे लाघवी असले, तरी भटक्या कुत्र्यांचा बऱ्याचदा उच्छाद सहन करावा लागतो. कुठे लहान मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनाही पाहायला मिळतात. अशाच प्रकारे भटक्या कुत्र्याने पाठलाग केल्याने स्कूटरस्वार दोन महिला आणि लहान मुलाला अपघात झाला. कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी महिलेने दुचाकी पळवली, मात्र या नादात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला धडकून तिघंही खाली पडले. या घटनेत तिघाही जणांना अनेक जखमा झाल्या आहेत. ओदिशातील बेरहामपूरमधील गांधीनगर लेन सात मध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताची संपूर्ण घटना कैद झाली आहे. सुप्रिया, सस्मिता आणि तिचे लहान मूल अपघातग्रस्त झाले आहेत.

“आम्ही सकाळी सहा वाजता मंदिरात जायला निघालो होतो. यावेळी जवळपास सहा ते आठ कुत्रे आमचा पाठलाग करू लागले. तेव्हाच, मी स्कूटरचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला, नाहीतर कुत्र्यांनी माझ्या बहिणीचा चावा घेतला असता” असे स्कूटर चालवणाऱ्या महिलेने सांगितले.

रामनवमीला डीजे लावण्यास पोलिसांनी रोखलं; दोन युवक थेट विषारी औषध प्यायले

“आम्ही थांबलेल्या कारला धडक दिल्याने मोठी दुर्घटना टळली. जर आम्ही विजेच्या खांबाला किंवा अन्यत्र धडकलो असतो किंवा नाल्यात पडलो असतो तर हा अपघात जीवघेणा ठरू शकतो.” अशी भीती स्कूटरवर मागे बसलेल्या महिलेने व्यक्त केली. घटनेनंतर पीडितांनी कुटुंबातील इतर सदस्यांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

दहा वर्षांनी लहान प्रियकराशी अनैतिक संबंध, अखेर लॉजच्या बाथरुममध्ये विवाहितेने गमावला जीव
दरम्यान, शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी बेरहमपूर महानगरपालिकेने (बीएमसी) कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

पाहा व्हिडिओ :

४५ वर्षांची मामी २४ वर्षीय भाच्याच्या प्रेमात, सुटकेच्या नादात आणखी फसली, ‘ते’ फोटो व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here