मुंबई: अनेकदा आपल्या डोळ्यापुढे अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपला माणुसकीवरील विश्वास आणखी दृढ होतो. कारण, माणसाने माणसाला निस्वार्थ मदत करणे हे आता काही सामान्य राहिलेलं नाही. त्यामुळे जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा ते नक्कीच आनंददायी आणि कौतुकास्पद असते. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जिथे एका उबर ड्रायव्हरने एका प्रवाशाचा जीव वाचवला आहे.गुड न्यूज मूव्हमेंटने इंस्टाग्रामवर एक कहाणी शेअर केली. टिम लेट्स नावाच्या एका उबेर ड्रायव्हरने बिल सुमील नावाच्या त्याच्या वृद्ध प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी त्याला आपली किडनी दान केली.


बिलने उबर कॅब बुक केली. तेव्हा टिम आपली कॅब घेऊन तिथे पोहोचला. “टिमच्या कॅबमधून डायलिसिस केंद्राकडे जाताना बिल सुमीलने त्याला त्याच्या आरोग्याबाबत सागण्यास सुरुवात केली.” असे कॅप्शन या पोस्टमध्ये दिले आहे. डायलिसिस सेंटरवर आल्यावर, उबर चालक टिम लेट्सने त्याला सांगितले की, देवाने तुम्हाला माझ्या कारमध्ये पाठवले आहे आणि टिमने त्याला त्याची किडनी दान करण्याची ऑफर दिली.

रामनवमीला डीजे लावण्यास पोलिसांनी रोखलं; दोन युवक थेट विषारी औषध प्यायले

त्यांची किडनी जुळली आणि सुमीलची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शस्त्रक्रियेनंतर एका वर्षानंतर, बिल सुमील यांच्या प्रकृतीत सुधार आहे आणि ते डेलावेअर विद्यापीठातील रेनल रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. टिम हा जर्मनीत राहतो. पण, बिल सांगतात की ते अजूनही त्यांच्या या मित्राच्या संपर्कात आहेत, ज्याने त्यांचा जीव वाचवला.

वडील इलेक्ट्रिशियन, क्रिकेट किटसाठी उधारी; कोचचा आधार, आता मुलाची IPL मध्ये धडाकेबाज कामगिरी
पोस्टमध्ये लेट्स आणि सुमील यांची हॉस्पिटलमधील फोटोही टाकण्यात आला आहे. सोशल मीडियावर या पोस्टला १८३ हजार पेक्षा जास्त लाईक्स आणि प्रेम मिळाले आहे. लेट्सच्या निस्वार्थीपणाने त्यांचे मन जिंकले, असे अनेकांनी सांगितले आहे. त्याचबरोबर अनेकांनी सुमीलला त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

एका रात्रीत वेटर झाला कोट्यधीश, तरी अजूनही करतो रेस्टॉरंटमध्ये काम, कारण वाचून कौतुक वाटेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here