भिलवाडा : सध्याच्या जगात काय होईल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना राजस्थानच्या भीलवाडामध्ये समोर आली आहे. इथे स्टेशनरीचं एक छोटंसं दुकान चालवणाऱ्या दिव्यांग युवकासोबत असं काही घडलं की वाचून तुम्हीही हादराल. आयकर विभागाचा सावळा गोंधळ अनेकदा आपण पाहिला आहे. असाच एक प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशनरीचं दुकान चालवणाऱ्या दिव्यांग तरुणाला आयकर विभागाने चक्क १२ कोटी २३ लाख रूपयांची वसूली नोटीस पाठवली आहे. ही नोटीस पाहिल्यानंतर तरुण हादरलाच. त्याने जेव्हा ही नोटीस वाचली तेव्हा त्याला आणखीनच धक्का बसला. कारण, या तरुणाच्या नावाने सुरतमध्ये दोन कंपन्या सुरू असल्याचं लिहण्यात आलं होतं. यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठत पोलिसांत तक्रार नोंदवली.

रेल्वे स्थानकात झाली जोडप्याची भांडणं, पोलिसांनी विचारताच पत्नी बरळली; पतीची बॅग उघडताच फुटला घाम…

दिव्यांग कृष्ण गोपाल छापरवाल असं या तरुणाचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, सांगानेर इथं त्याचं एक छोटं स्टेशनरीचं दुकान आहे. तो एक फोटोग्राफरही आहे. त्यामुळे महिन्याला तो ८ ते १० हजार रुपये महिन्याला कमावतो. पण तो हादरून गेला जेव्हा त्याच्या हातामध्ये १२ कोटी २३ लाख ९० हजाराची वसूली नोटीस आली. ही नोटीस त्याला आयकर विभागाकडून पाठवण्यात आली आहे.

भर रस्त्यात अडवलं, तलवार, लोखंडी रॉड अन् दांडक्याने बेदम मारलं; वादाचं कारण वाचून पोलीसही हादरले…

नोटीसमध्ये लिहल्या तरुणाच्या नावे सूरतमध्ये दोन कंपन्या…

या नोटीसमध्ये पॅनकार्ड आणि आधार कार्डचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असं म्हटलं आहे. त्याला मिळालेल्या नोटीसमध्ये त्याच्या नावे दोन कंपन्यांचा उल्लेख करण्यात आला होता. पण याचा तरुणाशी काहीही संबंध नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण कधी सूरतला गेलाच नाही.

पोलीस भरतीची लेखी परीक्षा पारदर्शक; खुल्या मैदानावर बैठक व्यवस्था तर 20 पेक्षाही अधिक कॅमेरे तैनात

तुम्हाला वाचून धक्का बसेल पण २०१९-२० या आर्थिक वर्षात संजय कॉलनी भिलवाडा इथे राहणारे कृष्ण गोपाल छापरवाल यांना रु.११ कोटी ७० लाख ७३ हजार ३७७ रूपयांची थकबाकी जमा करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर तरुण अस्वस्थ झाला आणि त्याने तातडीने पोलिसांची मदत घेतली. दरम्यान, या प्रकरणात आता पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

डिझेल संपल्यामुळे ट्रॅक्टर उभा, मागून भरधाव दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here