आजचा सोने-चांदीचा नवीन भाव
गुड रिटर्न्स किंवा वेबसाइटनुसार आज, मंगळवारी खरेदीदारांना २२ कॅरेट सोन्यासाठी १० ग्रॅम ५४,७०० रुपये तर २४ कॅरेटसाठी ५९,६७० रुपये मोजावे लागतील. तर आज १० ग्रॅम चांदीची किंमत ७४६ रुपये आहे. तर मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ५४,७०० रुपये प्रति १० ग्रॅम असून २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम ५९ हजार ६७० रुपये खर्च करावा लागणार आहे.
मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या
दरम्यान, बाजारात जाण्यापूर्वी जर तुम्हाला २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस कॉल द्या, ज्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे तुम्हाला दर प्राप्त होतील.
सोने आणि चांदीची लक्ष्य किंमत
वाढती महागाई आणि अस्थिर जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून नवीन आर्थिक वर्षात सोन्याच्या किमती १५-२०% परतावा देऊ शकतात. तसेच मौल्यवान सोन्याची किंमत ६६,००० ते ६८,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत मुसंडी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय केडिया अॅडव्हायझरीचे सीएमडी अजय केडिया यांच्या मते या आर्थिक वर्षात चांदी ३०% पर्यंत परतावा देऊ शकतात.
या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते
कच्च्या तेलाच्या कमी उत्पादनाने महागाई वाढणार
क्रूड ऑइलच्या उत्पादनात कपात करण्याच्या ओपेक देशांच्या निर्णयामुळे महागाई वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे. यामुळे यूएस फेड रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याची आपली आक्रमक भूमिका कायम ठेवण्याची देखील शक्यता आहे. तर क्रूडच्या उत्पादनावरील ओपेक देशांच्या निर्णयाचा सोन्याच्या दरांवरही परिणाम झाला आणि सोमवारी आशियाई व्यापार दरम्यान कॉमेक्सवर सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली.