pune breaking news, VIDEO पाहाच! चक्क ६ वाहनं एकमेकांना धडकली, पुण्यातील विचित्र अपघाताची चर्चा… – six vehicles collided with each other on the pune satara highway
पुणे : पुणे – सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावलगत वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सहा वाहने एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये ३ ट्रक, २ टेम्पो आणि १ कार या वाहनांचा समावेश आहे. या घटनेमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं.पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना समोरील वाहनाने अचानक ब्रेक मारल्यानं, मागून येणारी वाहने एकमेकांना धडकली. यामध्ये रस्त्यावर थांबलेले काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नसून यात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.