गेल्या डिसेंबरमध्ये पंतच्या कारला भीषण अपघात झाला. तेव्हापासून पंत स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. पंतच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पंत थोडा चालू लागला आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पंतच्या दिल्ली कॅपिटल्सचा पहिला लखनऊ सुपर जायंट्सशी झाला. या सामन्यावेळी पंतची १७ क्रमांकाची जर्सी दिल्लीच्या डगआऊटवर पाहायला मिळाली.
ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा अविभाज्य घटक असून तो कायम संघासोबत असल्याचं अधोरेखित करण्यासाठी दिल्लीच्या संघानं त्याची जर्सी डगआऊटवर ठेवली होती. मात्र याबद्दल बीसीसीआय नाराज आहे. ‘लखनऊविरुद्धच्या सामन्यात दिल्लीनं डगआऊटमध्ये जरा जास्तच वाढीवपणा केला. असले प्रकार टाळायला हवेत,’ अशा शब्दांत बीसीसीआयनं दिल्ली कॅपिटल्सला समज दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मुंबई इंडियन्सची टीम एअरपोर्टवर स्पॉट, जोफ्रा आर्चरने खाल्ला भाव
अतिशय दुर्दैवी प्रकार घडला असल्यास, एखादा खेळाडू निवृत्त झाला असल्यास त्याच्या आठवणी जागवण्यासाठी अशी कृती केल्यास समजू शकतो. पण आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ऋषभ पंतच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत आहे. त्यामुळे असा प्रकार टाळायला हवा, अशा शब्दांत बीसीसीआयनं दिल्ली कॅपिटल्सला समज दिल्याचं कळतं. पंतची जर्सी डगआऊटवर लावण्याची संकल्पना संघाचे प्रमुख प्रशिक्षक रिकी पॉटिंग यांची होती.