नगर: उपनेते, माजी मंत्री यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड, सून असा परिवार आहे.

अनिल राठोड हे विधानसभा मतदार संघातून सलग २५ वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनाने नगरमधील शिवसेना शोकमग्न झाली आहे. राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, राठोड यांना आठ दिवसापूर्वी करोना झाला होता. त्यामुळे त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. या उपचाराला ते चांगला प्रतिसादही देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः राठोड यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. राठोड यांना न्युमोनियाची लागणही झाली होती. त्यातून ते बरे होत होते. बरे वाटू लागल्याने त्यांनी हलका आहार घेण्यास सुरुवातही केली होती. मात्र आज पहाटे ६ वाजता त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

शिवसेनेचा नगरमधील आक्रमक चेहरा, शिवसेनेचा ढाण्यावाघ अशी राठोड यांची ओळख होती. त्यांनी नगरमधून शिवसेनेचं २५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व केलं होतं. नगरच्या राजकारणात त्यांचा प्रचंड दबदबाही होता. त्यामुळेच शिवसेनेने त्यांना राज्यात मंत्रीपद दिलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here