दुबे-अली यांनाही घातला आळा
गायकवाडची विकेट घेतल्यानंतर रवी बिश्नोईने मोईन अली आणि शिवम दुबे यांनाही पॅव्हेलियनमध्ये धाडले. मोईन अलीला बिश्नोईने गुगली टाकून अडकवले, हा खेळाडू १९ धावा करून बाद झाला. त्याचवेळी शिवम दुबेने दोन षटकार मारत बिश्नोईवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र या खेळाडूने जबरदस्त पुनरागमन करत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
बिश्नोईच्या या कामगिरीनंतर चाहत्यांनी केएल राहुलच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरे तर जेव्हा चेन्नईचा सलामीवीर वेगवान फलंदाजी करत होता, त्या काळात बिश्नोईला गोलंदाजी दिली नव्हती. या खेळाडूला १०व्या षटकात चेंडू देण्यात आला आणि तोपर्यंत चेन्नईने १०० चा टप्पा ओलांडला होता. गेल्या सामन्यात बिष्णोईने २ विकेट घेत दमदार कामगिरी केली होती पण तरीही राहुलने त्याला सुरुवातीची षटके दिली नाहीत. राहुलच्या या रणनीतीचा फटका लखनऊला बसला.
रवी बिष्णोईने फार कमी वयातच एक उत्कृष्ट फिरकीपटू म्हणून आपली बजावली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं. त्याने आपली अदंडार कामगिरीने पदार्पणाच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला. पण १० टी-२० सामने आणि १ वनडे सामना खेळल्यानंतर मात्र त्याला संघातून डच्चू मिळाला. त्याने या १० सामन्यांमध्ये १६ विकेट्स मिळवल्या.
अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं
क्रिकेटसाठी नाही दिली १२ वी ची परीक्षा
शिक्षक वडील असल्याने रवीने अभ्यासात लक्ष द्यावे, अभ्यास पूर्ण करावा असा त्यांचा मानस होता. पण रवीचे मन क्रिकेटमध्ये खूपच गुंतले होते. त्याने आयपीएलसाठी तर १२वी ची बोर्डाची परीक्षासुद्धा सोडून दिली. रवीने २०२० मध्ये आयपीएलमध्ये पर्दपण केले असून त्याने ३ सिझनमध्ये ३९ सामन्यात एकूण ४२ विकेट्स मिळवल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सच्या युट्युबवरील एका व्हिडीओमध्ये रवीने किस्सा सांगितला, “मी १२ वीत होतो आणि बोर्डाची प्रतीक्षा आली होती. त्यावेळेस मी राजस्थान रॉयल्स संघाचा नेट बॉलर होतो. एकीकडे वैदल बोराच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगत होते. तर दुसरीकडे संघाचे प्रशिक्षक क्रिकेटवर लक्ष देण्यास सांगत होते. मग अभ्यास आणि क्रिकेटमध्ये मी क्रिकेटची निवड केली. १२ वीची बोर्डाची परीक्षाही त्यावर्षी सोडली. पण एका वर्षानंतर मी पुन्हा बोर्डाची परीक्षा देत उत्तीर्णही झालो.”