मुंबई : प्रत्येक वर्षी देशातील कोट्यवधी करदात्यांना दिलेल्या वेळेत आयकर रिटर्न फाईल करावे लागते. आयकर रिटर्न भरण्याची तारीख जसजशी जवळ येते तसतसे लोक कर सूटचे पर्याय शोधू लागतात. तुम्ही अनेक प्रकारे कर कपातीचा लाभ घेऊ शकता. आयकर (इन्कम टॅक्स) कायद्यांतर्गत काम करणाऱ्यांना विशेष दिलासा दिला जातो. पेन्शन मिळवणाऱ्या करदात्यांनाही लाभ घेऊ शकतात, ज्याला मानक वजावट (स्टॅंडर्ड डिडक्शन) म्हणतात. यामध्ये, नोकरदार व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नातून काही रक्कम वजा करण्याची परवानगी आहे. यामुळे व्यक्तीचे करपात्र उत्पन्न कमी होते, ज्यामुळे त्याचे कर दायित्वही कमी होते.

कर सवलत कोणत्या कलमाखाली उपलब्ध
आयकर कायदा, १९६१ च्या कलम १६ अंतर्गत मानक कपातीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे करदात्यांचे वार्षिक उत्पन्न कमी असो किंवा जास्त त्यांना ठराविक रक्कमच कापण्याची मुभा आहे. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना यातून मोठा दिलासा मिळतो.

Old vs New Tax Regime: नोकरदारांसाठी कोणती कर व्यवस्था फायद्याची? तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे एका क्लिकवर
करदात्यांना किती दिलासा मिळणार?
यंदाच्या अर्थसंकल्पात मानक कपातीची रक्कम ५०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. आणि सर्व करदाते तसेच पेन्शनधारक या मानक कपातीचा लाभ घेऊ शकतात. सरकारी आणि खाजगी नोकरी करणारे करदात्यांना याचा लाभ मिळतो, मात्र स्वयंरोजगार करदात्यांना मानक कपातीचा लाभ मिळत नाही. त्याचप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या करदात्यांनाही हा सवलत मिळत नाही.

अर्रर्र… सरकारचाही अंदाज चुकला, कर संकलनात मोठी वाढ, देशासाठी आनंदाची बातमी!
मानक कर कपातीचा फायदा कोणाला?
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भारताने एखादा करदाता स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे मानक कपातीचा दावा करू शकतो. विशेष म्हणजे इतर वजावटींप्रमाणे या वजावटीचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. जर तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तर तुम्हाला कंपनीकडून फॉर्म १६ मिळाला असेल. यामध्ये मानक वजावटीनंतर कंपनी तुमचे एकूण करपात्र उत्पन्न दर्शवते.

सभागृहाच्या पायऱ्यांवर फोटो काढताना शंभूराज देसाई पुटपुटले, अजितदादांनी बुक्कीच दिली

मात्र, जर तुमच्या फॉर्म १६ मध्ये स्टँडर्ड डिडक्शनचा उल्लेख नसल्यास तुम्ही त्याबद्दल अर्थ (फायनान्स) विभागाला विचारू शकता. एखाद्या कर्मचाऱ्याला स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ देण्याची जबाबदारी कंपनीच्या फायनान्स विभागाची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here