महागाई दराचा अंदाज
जागतिक बँकेने यापूर्वी चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दर ६.६% राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. आता हा अंदाज पुन्हा घटवून ६.३ टक्के केला आहे. दरम्यान, या अहवालातील चांगली बाब म्हणजे जागतिक बँकेने भारताच्या महागाई दराचा अंदाजही कमी केला आहे. जागतिक बँकेने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारतासाठी महागाई दराचा अंदाज ६.६% वरून ५.२ टक्क्यांवर आणला आहे.
आगामी काळात भारतातील वस्तूंच्या किमती कमी होण्याची अपेक्षा असल्याचा हा संकेत आहे. जागतिक बँक भारताच्या आर्थिक विकास दरात सातत्याने घट होण्याचा अंदाज व्यक्त करत आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी ६.९ टक्के जीडीपीचा अंदाज आहे.
जागतिक बँकेने काय म्हटले
जागतिक बँकेने म्हटले की, चालू वर्षात घटलेला खप, मंद वाढ आणि आव्हानात्मक बाह्य परिस्थिती यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काही नकारात्मक परिणाम दिसून येतील. जागतिक बँकेचे भारतीय संचालक ऑगस्टे टॅनो केयोम म्हणाले की सतत जागतिक आव्हाने आणि बाह्य धक्के असूनही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत कल दर्शवेल. भारताची सेवा निर्यात वाढत राहील आणि देशाची चालू खात्यातील तूट कमी होईल. करोना महामारीनंतर केंद्र सरकारने घेतलेल्या आर्थिक मदतीच्या उपाययोजना हळूहळू मागे घेतल्याने सरकारी वापराच्या आकडेवारीतही मंदी दिसून येईल, असेही जागतिक बँकेने म्हटले आहे.
‘या’ मॅचमध्ये भारताने फ्रान्सला हरवले