बिटा-१ सेक्टरमध्ये अमिया सिन्हा यांनी घर घेतलं. त्यांचा मुलगा प्रणव रंजन सिन्हा गाझियाबादच्या वैशाली परिसरात वास्तव्यास आहे. प्रणव आणि त्यांची पत्नी गाझियाबादमध्येच नोकरीला आहेत. ‘गेल्या अनेक दिवसांपासून आईच्या मोबाईलवर कॉल करत होतो. मात्र अनेकदा फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही,’ असं प्रणव यांनी सांगितलं.
‘आई अनेकदा नाराज झाली की फोन घेत नाही. मात्र काही दिवसांपासून ती फोनच घेत नव्हती. त्यामुळे पत्नी आणि सासूला घेऊन रविवारी रात्री बिटा-१ मध्ये असलेल्या आईच्या घरी पोहोचलो. आम्ही दार ठोठावलं. पण दार उघडलं नाही. त्यामुळे दरवाजा तोडून आत गेलो. तिथे आईचा मृतदेह दिसला,’ अशा शब्दांत प्रणव यांनी घटनाक्रम कथन केला.
आईच्या निधनाची माहिती प्रणवनं पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पोलिसांनी अमिया यांचा फोन ताब्यात घेतला. अमिया यांचा फोन केव्हापासून स्विच्ड ऑफ होता, त्यांचा शेवटचा संपर्क कोणाशी झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?
वृद्ध असलेल्या अमिया यांचा मृतदेह फरशीवर आढळून आला. बेडवर मच्छरदाणी लावलेली होती. पण तिची एक बाजू व्यवस्थित नव्हती. अमिया यांचा मृत्यू बेडवरून पडल्यानंतर झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांना घरात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण समजेल, असं पोलिसांनी सांगितलं.